मुंबई, ५ जुलै (वार्ता.) – काँग्रेसचे नेते राहुल गांधी यंदा प्रथमच अवघ्या महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असणार्या आषाढी वारीत सहभागी होणार आहेत; पण भाजपने त्यांच्या या कार्यक्रमाला कडाडून विरोध केला आहे. निवडणूक डोळ्यांपुढे ठेवून भोळ्याभाबड्या वारकर्यांची दिशाभूल करण्यासाठी राहुल गांधी वारीत सहभागी होणार असतील, तर आम्ही त्यांचा निषेध आणि विरोध करतो, असे भाजपचे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी म्हटले आहे.
‘लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी येत्या १४ जुलै या दिवशी पालखी सोहळ्यात सहभागी होणार आहेत. ते संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे दर्शन घेणार आहेत. ते सर्वसामान्य वारकर्यांसारखे वारीत पायी चालतील’, अशी माहिती काँग्रेस आमदार संजय जगताप यांनी दिली आहे.