साधकांनो, सर्वस्वाचा त्याग भावनेपोटी नाही, तर भावाच्या स्तरावर करावा !
‘हे सर्व देवाचे आहे, त्याचे त्यालाच द्यायचे आहे’, यासारख्या नि:स्वार्थ विचाराने आणि भावाच्या स्तरावर कृती केल्यास ईश्वराचा आशीर्वाद लाभून जलद आध्यात्मिक उन्नती होते.’
‘हे सर्व देवाचे आहे, त्याचे त्यालाच द्यायचे आहे’, यासारख्या नि:स्वार्थ विचाराने आणि भावाच्या स्तरावर कृती केल्यास ईश्वराचा आशीर्वाद लाभून जलद आध्यात्मिक उन्नती होते.’
नवरात्रीच्या कालावधीत रामनाथी आश्रमात झालेल्या यज्ञाच्या वेळी २ दिवस ‘ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे ।’ हा मंत्र रुक्मिणीने ऐकला. तेव्हा तिला तो लगेचच मुखोद्गत झाला आणि तिने तो अचूक म्हणून दाखवला.
‘निर्विचार’ हा नामजप आपण कधीच कुठे वाचलेला नाही किंवा ऐकलेला नाही, तरी हा जप इतका प्रभावी आहे. यावरून ‘हा नामजप महाविष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संकल्पाने सिद्ध केला आहे’, असे मला जाणवले.
वर्ष २०२३ मध्ये एक सुप्रसिद्ध गायिका रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आल्या होत्या. आश्रमात चालणार्या विविध सेवांविषयी आणि त्या-त्या सेवेशी संबंधित माहिती ऐकून न घेता त्या पुढे-पुढे जात होत्या. आश्रमात चालू असलेल्या एका शिबिरातील एका सत्राला त्या बसल्या. त्यात चालू असलेला विषय पूर्ण न ऐकताच त्या मध्येच बाहेर आल्या. ‘सनातन प्रभात’चे कार्यालय पहातांना ‘हिंदु राष्ट्रा’वरून … Read more
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. मुख्यमंत्री शिंदे कोल्हापूर दौर्यावर आले असता ही भेट झाली. या प्रसंगी शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने, तसेच अन्य उपस्थित होते.
सातारा ते कागल सहापदरीकरणाचे काम चालू असून कागल ते कणेरीवाडी, गोकुळ शिरगाव, उजळाईवाडी, उंचगाव या रस्त्यावर खोदाईचे काम चालू असून गांधीनगर जीवन प्राधिकरण नळ पाणीयोजनेच्या वाहिनीस गळती लागली आहे.
ज्ञानवापीच्या धर्तीवर मध्यप्रदेश उच्च न्यायालयाने धार भोजशाळेचे सर्वेक्षण करण्याचा आदेश पुरातत्व विभागाला दिला आहे. राजा भोजने बांधलेली ही भोजशाळा एक विद्यापीठ होते.