उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! चि. रुक्मिणी अविनाश जाधव ही या पिढीतील एक आहे !
माघ कृष्ण पंचमी (२९.२.२०२४) या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील चि. रुक्मिणी अविनाश जाधव हिचा चौथा वाढदिवस झाला. त्यानिमित्त तिची आई आणि साधिका सौ. कृष्णाली राजेंद्र दुसाने यांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
‘वर्ष २०२१ मध्ये ‘चि. रुक्मिणी अविनाश जाधव उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आली असून तिची आध्यात्मिक पातळी ५७ टक्के आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२४ मध्ये तिची आध्यात्मिक पातळी ५९ टक्के झाली आहे . तिच्यावर पालकांनी केलेले योग्य संस्कार, तिची साधनेची तळमळ आणि तिच्यातील भाव यांमुळे आता तिची साधनेत प्रगती होत आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (४.३.२०२४) |
१. वय ७ मास ते दीड वर्ष
१ अ. ‘नामकरण विधीच्या वेळी तुला बिंदल्या देवबाप्पाकडून मिळाल्या आहेत’, असे सांगितल्यावर बिंदल्यांना भावपूर्ण नमस्कार करणे : ‘रुक्मिणी ७ मासांची असतांना तिचा रामनाथी आश्रमात नामकरण विधी झाला होता. त्या वेळी तिला भेट म्हणून बिंदल्या (हातांत घालायची चांदीची कडी) मिळाल्या होत्या. एकदा मी तिला म्हणाले, ‘‘या बिंदल्या तुला देवबाप्पाकडून (परात्पर गुरुदेवांकडून) मिळाल्या आहेत. त्यामुळे त्या आपण सांभाळून ठेवूया.’’ हे वाक्य ऐकल्यावर तिने त्या बिंदल्या मस्तकाला लावून त्यांना भावपूर्ण नमस्कार केला.’ – सौ. स्वानंदी अविनाश जाधव (चि. रुक्मिणीची आई), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१ आ. प्रेमभाव
१. ‘बागेत एखादे सुंदर फूल उमलले की, फुलपाखरे त्याच्या भोवती फिरत असतात, त्याप्रमाणे रुक्मिणी आली की, सर्व साधक तिच्या भोवती जमा होतात आणि तिलासुद्धा सर्वांशी बोलायचे असते.
२. रुक्मिणी खाऊ खात असतांना इतरांनी तिच्याकडे खाऊ मागितल्यास ती लगेच त्यांना देते.
१ आ. सतर्कता : एकदा तिच्या आईने तिला ‘आढाव्याला जाऊया’, असे सांगितले. त्या वेळी ती खोलीच्या दाराजवळ गेली आणि ‘कपाटाचे दार उघडे आहे’, हे पाहून ती पुन्हा मागे आली आणि तिने कपाटाचे दार बंद केले. रुक्मिणी लहान असूनही ती या सर्व गोष्टी न सांगता करते.
१ इ. रुक्मिणीला आईने जेवण भरवण्यापेक्षा स्वतःच्या हाताने जेवायला आवडते.
१ ई. ती पडल्यावरही रडत नाही. तिला पडण्याची किंवा लागण्याची भीती वाटत नाही.’
– सौ. कृष्णाली राजेंद्र दुसाने (पूर्वाश्रमीच्या कु. दीपाली माळी, आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ३१ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल.
१ उ. भाव
१ उ १. ‘सायंकाळी रामनाथी आश्रमात पू. सुमनमावशी (सनातनच्या ६२ व्या संत पू. सुमन नाईक, वय ७५ वर्षे) येतात. तेव्हा रुक्मिणी त्यांना नमस्कार करते.
१ उ २. रुक्मिणीच्या बोलण्यातून आध्यात्मिक स्तरावरील उपाय झाल्याचे जाणवणे : एक दिवस मला आध्यात्मिक त्रासामुळे श्वास घ्यायला त्रास होत होता आणि मला पुष्कळ रडू येत होते. त्या वेळी रुक्मिणी खोलीत आली. तेव्हा तिच्या बोलण्याने माझे रडणे थांबून मी हसू लागले. तेव्हा ‘तिच्यामुळे माझ्यासाठी आध्यात्मिक लाभ झाला’, असे मला जाणवले.’
– सौ. कृष्णाली राजेंद्र दुसाने (पूर्वाश्रमीच्या कु. दीपाली माळी, आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ३१ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल.
२. वय अडीच ते ३ वर्षे
२ अ. लिखाणाची आवड असणे : ‘तिला लिखाणाची पुष्कळ आवड आहे. ती साधारण अडीच वर्षाची असल्यापासून वही आणि लेखणी घेऊन लिहिण्याचा प्रयत्न करते. एकदा तिच्या लिखाणातून आपोआपच ‘राम’ आणि ‘परात्पर’, असे शब्द लिहिले गेले.
२ आ. सात्त्विक गोष्टींची आवड
१. ‘ती सकाळी उठल्यावर ‘कराग्रे वसते लक्ष्मी…’ हा श्लोक म्हणते.
२. तिला देवाच्या गोष्टी ऐकायला आवडतात, तसेच देवपूजा करायला आवडते. ती नेहमी देवाशी संबंधित खेळ खेळते. मी तिला देवतांविषयी सांगितलेल्या गोष्टी ती तिच्या खेळण्यातील बाहुल्यांना सांगते.
२ इ. इतरांचा विचार करणे : रुक्मिणी अडीच वर्षाची असतांना एकदा मी तिला ‘मला चांगली बुद्धी मिळू दे’, अशी प्रार्थना करायला सांगितली. तेव्हा तिने तिची मैत्रीण चि. आनंदी सुतार (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ४ वर्षे) हिच्यासाठीही तशी प्रार्थना केली.
३. वय ३ ते ४ वर्षे
३ अ. उत्तम स्मरणशक्ती आणि आकलनक्षमता
१. तिला कुठलीही गोष्ट १ – २ वेळा सांगितली, तरी ती तिच्या स्मरणात रहाते. मागील वर्षी नवरात्रीच्या कालावधीत रामनाथी आश्रमात झालेल्या यज्ञाच्या वेळी २ दिवस ‘ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे ।’ हा मंत्र रुक्मिणीने ऐकला. तेव्हा तिला तो लगेचच मुखोद्गत झाला आणि तिने तो अचूक म्हणून दाखवला.
२. मी तिला प्रतिदिन गोष्टी सांगते. त्या तिला उत्तम प्रकारे आकलन होतात. एकदा मी तिला श्रीकृष्णाचे बोट कापल्यावर द्रौपदीने त्याच्या बोटाला चिंधी बांधल्याची आणि शबरीने श्रीरामाला बोरे खायला दिल्याची गोष्ट सांगितली होती. या गोष्टी तिला काही दिवसांनंतरही आठवत होत्या.
३ आ. आवड-नावड नसणे : रुक्मिणीला अगदी लहान असल्यापासून खाण्या-पिण्याविषयी कसलीच आवड-नावड नाही. ती जे असेल, ते आनंदाने जेवते.
३ इ. शिकण्याची वृत्ती : मी आश्रमात सेवा करत असतांना रुक्मिणी माझ्या जवळच असते. ती मी करत असलेल्या सेवा शिकण्याचा प्रयत्न करते, उदा. मी साधकांसाठी पटलावर ठेवण्यासाठी खाऊ काढत असतांना ‘खाऊच्या पुड्यांचे वेष्टन कापणे, खाऊ डब्यात ठेवणे, चमचे व्यवस्थित लावणे, भांडी पुसणे’, तसेच मी कपड्यांच्या शिलाईची सेवा करत असतांना ‘कपड्यांची शिलाई उसवणे’ इत्यादी सेवा करण्याचा प्रयत्न ती करते.
३ ई. तिला ‘सात्त्विक कपडे घालणे, बांगड्या घालणे, कुंकू लावणे’ इत्यादी कृती करायला मनापासून आवडते.
३ उ. चूक झाल्यावर क्षमायाचना करणे : मी तिला तिची चूक सांगून क्षमायाचना करायला सांगितल्यावर ती साधकांना स्वतःची चूक सांगून क्षमायाचना करते. ती प्रतिदिन स्वतःकडून झालेल्या चुकांसाठी देवाकडे क्षमा मागते.
३ ऊ. देवासाठी नृत्य करायला आवडणे : ‘देवासाठी नृत्य करणे’, हा तिचा आवडीचा विषय आहे. आम्ही तिला कोणतेही नृत्य शिकवलेले नाही, तरीही ती एखाद्या नृत्य शिकलेल्या मुलीप्रमाणे नृत्य करते.
३ ए. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ हेच माझे खरे आई-बाबा आहेत’, असे ती सांगते.
३ ऐ. जाणवलेला पालट : पूर्वी ती मला सेवा करत असतांना थोडा त्रास द्यायची; पण आता तिचे त्रास देणे अत्यल्प झाले आहे.
‘हे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव, ‘आपली, तसेच श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची कृपा अन् आश्रमदेवतेचे चैतन्य यांमुळे रुक्मिणीच्या मनात साधनेचे बीज रोवले जाऊन तिच्यावर साधनेचे संस्कार होत आहेत’, याबद्दल ‘आमच्या मनात आपल्याप्रतीचा कृतज्ञताभाव वाढू दे’, हीच आपल्या श्री चरणी अनन्यभावे प्रार्थना आहे.’
– सौ. स्वानंदी अविनाश जाधव (चि. रुक्मिणीची आई), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.२.२०२४)
रुक्मिणी – रामनाथी आश्रमातील एक गोंडस पाखरू ।
रामनाथी आश्रमात एक गोंडस पाखरू असे ।
समष्टीत चैतन्याचा वर्षाव होत असे ।।
जणू श्रीकृष्णाचे बालपण असे ।
साधकांना भावविभोर ती करत असे ।। १ ।।
हास्य जणू चैतन्याचा धबधबा वाहे ।
स्वर जणू तलवारीची धार भासे ।।
जशी ही मधुर असे ।
तशीच ती शूरही असे ।। २ ।।
– सौ. कृष्णाली राजेंद्र दुसाने (पूर्वाश्रमीच्या कु. दीपाली माळी, आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ३१ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |