महाविष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सिद्ध केलेला ‘निर्विचार’ हा नामजप म्हणजे साधकांच्या हाती दिलेला अमृतकुंभ !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. महाविष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘निर्विचार’ हा नामजप संकल्पाने सिद्ध केलेला असणे

‘निर्विचार’ हा नामजप आपण कधीच कुठे वाचलेला नाही किंवा ऐकलेला नाही, तरी हा जप इतका प्रभावी आहे. यावरून ‘हा नामजप महाविष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संकल्पाने सिद्ध केला आहे’, असे मला जाणवले.

२. महाविष्णुस्वरूप गुरुदेव ‘निर्गुण’ या समष्टी नामजपाच्या माध्यमातून विराट रूपात उभे असणे आणि त्यातून साधकांना भक्तीची अनुभूती देणे

श्री. प्रसाद हळदणकर

‘जे साधक आणि संत समष्टीसाठी नामजप करतात, त्यांनीही प्रार्थना करून निर्विचार हाच जप करावा’, असे आहे. यावरून लक्षात येते की, या जपामागे साक्षात् महाविष्णुस्वरूप गुरुदेव विराट अशा रूपात उभे आहेत आणि या निर्गुण जपातही भक्तीची अनुभूती देत आहेत.

३. गुरुदेवांनी अनेकातून एकात या तत्त्वाला धरून निर्विचार हा जप संकल्पाने सिद्ध करणे आणि तो अमृतकुंभाप्रमाणे साधकांना देणे

जसे अनेक संत, महात्मे, ऋषी यांनी संकल्प करून सिद्ध केलेली स्तोत्रे, मंत्र याचा लाभ आपण करून घेतो, तसे गुरुदेवांनी अनेकातून एकात या तत्त्वाला धरून हा जप संकल्पाने सिद्ध केला आहे. अनेक जन्म तप करूनही मिळेल, याची शाश्वती नसणारा अमृतकुंभ त्यांनी साधकांच्या हाती दिला आहे.

‘गुरुदेवांच्या या अपार कृपालीलेचे वर्णन करण्यासाठी ना माजी पात्रता आहे, ना माझ्याकडे शब्द आहेत.’

– श्री. प्रसाद हळदणकर, बेळगाव

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक