‘साधना करतांना ‘सर्वस्वाचा त्याग’, हा सर्वांत महत्त्वाचा टप्पा असतो. यासाठी काही वेळा काही साधकांकडून इतरांचे ऐकून भावनेपोटी कृती केली जाते. त्यामुळे अपेक्षित फलप्राप्ती होत नाही. कधी साधक सर्वस्वाचा त्याग करतांना त्यामध्ये ‘मला हे पाहिजे.’, यांसारख्या विचारांनी कृती करत असल्यास त्यामध्ये स्वार्थ असतो. त्यामुळे केलेल्या कृतीसाठी ईश्वराचा आशीर्वाद लाभत नाही. परिणामी अपेक्षित फलप्राप्ती होत नाही.
हीच कृती ‘हे सर्व देवाचे आहे, त्याचे त्यालाच द्यायचे आहे’, यासारख्या नि:स्वार्थ विचाराने आणि भावाच्या स्तरावर कृती केल्यास ईश्वराचा आशीर्वाद लाभून जलद आध्यात्मिक उन्नती होते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले