वर्ष २०२२ मध्ये २८० दिवस मुंबईतील हवा अधिक प्रदूषित !
वर्ष २०२२ मध्ये ३६५ दिवसांपैकी २८० दिवस मुंबईतील हवा प्रदूषित झाली होती. वर्षभरात हवेची गुणवत्ता खाली आल्याचा अहवाल केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निरीक्षणाच्या आधारे पर्यावरण अभ्यासक सुरेश चोपणे यांनी मांडला आहे.