आसाममध्ये मुसलमानांच्या २ गटांमधील हाणामारीत १ जण ठार

आसाममध्ये मुसलमानांच्या २ गटांमधील हाणामारी

गौहत्ती – राज्यातील धुबरी जिल्ह्यातील बिलासीपारा येथे मशीद समितीच्या २ गटांमध्ये झालेल्या हिंसाचारात १ जण ठार आणि २० जण घायाळ झाले. ठार झालेल्या मुसलमानाचे नाव हारून रशीद असे आहे. रशीद ठार झाल्यानंतर त्याच्या संतप्त नातेवाइकांनी राष्ट्रीय महामार्ग रोखला आणि आक्रमणकर्त्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. पोलिसांनी आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्ग खुला केला. या हिंसाचाराच्या प्रकरणी २ गटांकडून दोन वेगवेगळ्या तक्रारी प्रविष्ट करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. ‘मशीद समिती कुठल्या गटाच्या कह्यात असणार ?’, या वादातून हा हिंसाचार झाल्याची माहिती समोर आली आहे.

संपादकीय भूमिका

  • ‘हिंदूंमध्ये जातीव्यवस्था असून त्यांच्यात मतभेद होतात’, असे सांगून हिंदूंची अपकीर्ती करणारी प्रसारमाध्यमे मुसलमानांमधील गटबाजीमुळे होणारा हिंसाचार आणि त्यातून होणार्‍या हत्या यांना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी का देत नाही ?