‘कर्तेपणामुळे साधनेची घसरण होते आणि कृतज्ञतेमुळे साधनेत प्रगती होते’, असे शिकवणारे सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

अधिवक्‍ता नीलेश सांगोलकर

१. ‘कर्तेपणा’ शब्‍दाचा अर्थ

‘कर्तेपणा’ म्‍हणजे ‘एखादी कृती किंवा विचार स्‍वतः केला आहे’, असे वाटणे आणि तसे इतरांना दाखवण्‍याचा प्रयत्न करणे. हे म्‍हणजे स्‍वत:च स्‍वत:ला प्रशस्‍तीपत्रक देण्‍यासारखे आहे. ‘मी’ केल्‍याचे प्रत्‍येक ठिकाणी मिरवणे, ‘मला सुचले’, असे वाटणे किंवा ‘मी केले’, असा विचार करून जगणे, म्‍हणजे ‘कर्तेपणा असणे’. हा अहंचा पैलू आहे.

२. कर्तेपणा आणि कृतज्ञता

‘आपण कुठे कुठे कर्तेपणा घेतोे?’, याचा अभ्‍यास केल्‍यावर लक्षात आले की, ‘आपण केवळ मोजक्‍याच प्रसंगात कृतज्ञता अनुभवतो. शेष सर्व ठिकाणी आपण कर्तेपणा घेत असतो. जर आपण दिवसभरात ‘कर्तेपणाच्‍या ऐवजी कृतज्ञता’ अनुभवण्‍याचा प्रयत्न वाढवला, तर गुरुमाऊली निश्‍चितच आपल्‍याला कृतज्ञताभावातील आनंदात ठेवील. हे आपण अनुभवायला हवे.

३. निर्जीव वस्‍तूंत कर्तेपणा नसून समर्पणभाव असणे

आपण वापरत असलेल्‍या निर्जीव वस्‍तूंमध्‍ये कर्तेपणा नसतो. त्‍यामुळे कुणीही त्‍यांचा कसाही वापर केला, तरी त्‍या समर्पणभावातच असतात. त्‍यांच्‍यात कर्तेपणा नसल्‍याने त्‍यांचा जसा वापर करू, तसा त्‍या करू देतात; परंतु आपण मात्र त्‍यांच्‍या साहाय्‍याने केलेली कृतीही ‘मी केली’; म्‍हणून मिरवतो, उदा. टंकलेखन केल्‍यावर आपल्‍याला ‘मी हे केले’, अशी कर्तेपणाची जाणीव होते; पण ज्‍याच्‍या साहाय्‍याने आपण टंकलेखन केले, त्‍या संगणकाला मात्र कोणताही कर्तेपणा नसतो. आपण त्‍याचा जसा वापर करू, तसा तो करू देतो. यातून ‘त्‍याच्‍यात समर्पणभाव किती आहे !’, हे लक्षात येते.

४. कर्तेपणाविषयी गुुरुमाऊलींची शिकवण

कर्तेपणा आला की, साधनेची घसरण होते आणि कृतज्ञता निर्माण झाली की, साधनेत प्रगती होते’, असे गुरुमाऊलींनी (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) सांगितले आहे. कृतज्ञताभावाचे गुरुमाऊलींव्‍यतिरिक्‍त जगाच्‍या पाठीवर अन्‍य उत्तम उदाहरण नाही. ते कर्ते-करविते असूनही ‘मी नाही केले. तुमच्‍या भावामुळे झाले’, असे आपल्‍याला सांगून ते पुन्‍हा कृतज्ञताभावात रहातात. साधकांना श्‍वास देऊन आणि मनुष्‍यजन्‍माच्‍या सार्थकतेचा ध्‍यास देऊन पुन्‍हा ‘हे सर्व तुमच्‍यामुळे झाले’, असे सांगण्‍यात किती पराकोटीचा कृतज्ञताभाव आहे ! आपण जर हे सतत ध्‍यानात ठेवले, तर आपल्‍या डोंगराएवढ्या कर्तेपणाचे कृतज्ञताभावात रूपांतर झाल्‍याविना रहाणार नाही.

‘गुरुमाऊली, ही सूत्रे सुचवून मला सदैव कृतज्ञताभावात रहाण्‍याची जाणीव करून दिल्‍याबद्दल मी आपल्‍या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– अधिवक्‍ता नीलेश सांगोलकर (आध्‍यात्मिक पातळी ६३ टक्‍के), पंढरपूर (६.७.२०२३)