सद़्‍गुरु अनुराधा वाडेकर यांची भेट झाल्‍यावर प्रसन्‍न आणि आनंदी होणार्‍या ६७ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या ठाणे येथील सौ. नम्रता ठाकूर (वय ६२ वर्षे) !

सद़्‍गुरु अनुराधा वाडेकर यांची भेट !

सद्गुरु (सुश्री (कु.)) अनुराधा वाडेकर

१ ए १. सौ. नम्रताला सद़्‍गुरु अनुराधा वाडेकर यांना भेटण्‍याची ओढ लागणे : आम्‍ही सौ. नम्रताला भेटलो, तेव्‍हा ती झोपून होती. तिला फारसे अन्‍न जात नव्‍हते. त्‍यामुळे तिला पुष्‍कळ अशक्‍तपणा आला होता. ती केवळ प.पू. गुरुदेव आणि सद़्‍गुरु अनुराधाताई (सद़्‍गुरु अनुराधा वाडेकर) यांचेच नाव घेत होती. ‘ते येणार आहेत आणि मला बरे करणार आहेत’, असे ती सतत बोलत होती. रुग्‍णालयातून घरी आणल्‍यानंतर तिच्‍या चेहर्‍यामध्‍ये पालट होऊन चेहर्‍यावर तेज दिसू लागले.

१ ए २. सद़्‍गुरु अनुराधा वाडेकर यांच्‍या भेटीनंतर सौ. नम्रताचा चेहरा समाधानी आणि तेजस्‍वी दिसणे : २.८.२०२३ या दिवशी ‘सद़्‍गुरु अनुराधाताई भेटायला येणार आहेत’, असा आम्‍हाला निरोप मिळाला. तेव्‍हा घरातील वातावरण एकदम सकारात्‍मक झाले. सद़्‍गुरु अनुताईंनी (सद़्‍गुरु अनुराधा वाडेकर यांनी) घरी आल्‍यावर नम्रताताईच्‍या डोक्‍यावरून मायेने हात फिरवला. तेव्‍हा तिने डोळे पूर्ण उघडले आणि ती पुष्‍कळ आनंदी झाली. घरातील वातावरणही एकदम आनंदी झाले. नम्रताताईची इच्‍छा पूर्ण झाली. तिच्‍या चेहर्‍यावरचे तेज वाढले आणि ती पुष्‍कळ समाधानी दिसू लागली. सद़्‍गुरु अनुताईंच्‍या भेटीनंतर घरातील वातावरण भावमय, सकारात्‍मक आणि प्रसन्‍न झाले.

प.पू. गुरुदेव आणि आणि सद़्‍गुरु अनुराधाताई यांच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्री. मिलिंद करंगुटकर, कुडाळ (सौ. नम्रता ठाकूर यांचा मोठा भाऊ)

सौ. नम्रता ठाकूर

 १. श्री. मिलिंद करंगुटकर, कुडाळ (सौ. नम्रता ठाकूर यांचा मोठा भाऊ)

श्री. मिलिंद करंगुटकर

१ अ. प्रेमळ आणि मनमिळाऊ स्‍वभाव

१. ‘माझी लहान बहीण सौ. नम्रता ठाकूर लहानपणापासून प्रेमळ आणि हसतमुख आहे. तिच्‍या प्रेमळ आणि मनमिळाऊ स्‍वभावामुळे ती मित्रमैत्रिणी अन् नातेवाईक यांच्‍यामध्‍ये प्रिय आहे.

२. मला हृदयरोगाचा त्रास झाल्‍यापासून ती नेहमी माझ्‍या संपर्कात राहून माझी विचारपूस करीत असे आणि मला काळजी घेण्‍यास सांगत असे.

१ आ. इतरांना समजून घेणे : मुख्‍य म्‍हणजे ती कधीही ‘याचे त्‍याला, त्‍याचे याला’, असे सांगत नाही. कुणीही तिला कुणाविषयी काही सांगितले, तरी ती त्‍याचा बाऊ न करता ती शांत रहाते.

१ इ. इतरांचा विचार करणे : ९.७.२०२३ या दिवशी मला ‘सौ. नम्रताताईला स्‍मृतीभ्रंश झाला आहे आणि तुम्‍ही सर्वांनी भेटून जा’, असे सांगितले. १४ जुलै या दिवशी माझा वाढदिवस असतो; म्‍हणून १४ जुलैला आमचे तिला भेटायला जायचे ठरले; परंतु काही कारणास्‍तव आम्‍हाला जाता न आल्‍याने मी तिच्‍याशी दूरभाषवर बोललो. तेव्‍हा एवढी गंभीर रुग्‍णाईत असूनही ती मला म्‍हणाली, ‘‘मला तुझा वाढदिवस येथे ठाण्‍याच्‍या घरी साजरा करायचा होता.’’

१ ई. सकारात्‍मक राहून परिस्‍थितीचा स्‍वीकार करणे : वर्ष २०१४ मध्‍ये तिला कर्करोग झाल्‍याचे निदान झाले. तेव्‍हा ‘तिला हे कसे सांगायचे ?’, असा आमच्‍यासमोर मोठा प्रश्‍न होता; परंतु तिला रुग्‍णालयात भरती केल्‍यावर तेथे लावलेले भित्तीपत्रक बघून स्‍वत:ला कर्करोग झाल्‍याचे तिला समजले होते. तिने ते सकारात्‍मकरित्‍या स्‍वीकारले होते.

१ उ. सतत सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या अनुसंधानात राहून शांत आणि हसतमुख असणे : रुग्‍णाईत असतांनाही ती शांत आणि हसतमुख होती. ती सतत प.पू. गुरुदेवांच्‍या (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या) अनुसंधानात होती. त्‍यामुळे तिला १० – १२ ‘किमोथेरपी’ (कर्करोगावरील औषधप्रणाली) दिल्‍यावरही अजिबात त्रास जाणवला नाही. त्‍यानंतर ती बरी झाली आणि नेहमीप्रमाणे जीवन जगत होती. नंतर पुन्‍हा वर्ष २०१८ मध्‍ये तिला तसाच त्रास झाला. तेव्‍हाही ती गुरुकृपेने त्‍यातून बरी झाली.

१ ऊ. कृतज्ञताभाव : ‘घरातील सर्व जण माझी चांगली सेवा करत आहेत’, असे सांगून ती हात जोडून कुटुंबियांप्रती कृतज्ञता व्‍यक्‍त करत होती.

२. सौ. शामल मिलिंद करंगुटकर, कुडाळ (सौ. नम्रता ठाकूर यांची वहिनी)

सौ. शामल करंगुटकर

२ अ. सद़्‍गुरु अनुताईर्ंंच्‍या भेटीनंतर सौ. नम्रताताईंचे असंबद्ध बोलणे बंद होऊन चेहर्‍यात पुष्‍कळ पालट होणे : ‘मी सौ. नम्रताताईंना भेटले, तेव्‍हा त्‍यांची प्रकृती पुष्‍कळ खालावली होती. त्‍या मला काहीतरी सांगत होत्‍या, ‘२ मुली बसल्‍या आहेत. चला रांगोळी काढा, सिद्धता करा, ५ बायका येतील, त्‍यांची ओटी भरायची आहे.’ त्‍या बायकांची ‘ओटी कशी भरायची ?’ तेही त्‍यांनी मला समजावून सांगितले. नंतर त्‍या मला म्‍हणाल्‍या, ‘‘माझीही सिद्धता कर. मला व्‍यासपिठावर जायचे आहे. मला चांगली साडी नेसव. विमान येणार आहे.’’ आम्‍ही त्‍यांना विचारले, ‘‘कुठे जायचे आहे ?’’ तेव्‍हा त्‍या म्‍हणाल्‍या, ‘वैकुंठात !’’ सद़्‍गुरु अनुताई त्‍यांना भेटायला घरी आल्‍यानंतर त्‍यांचे असंबद्ध बोलणे एकदम बंद झाले आणि त्‍यांचा चेहर्‍यात पुष्‍कळ पालट झाला.

२ आ. देवाकडून प्रारब्‍धभोग सहन करण्‍याचे बळ मिळणे : आपण देवाला प्रार्थना करतो, ‘मला प्रारब्‍धभोग सहन करण्‍याची शक्‍ती दे’, तेव्‍हा ‘देव शक्‍ती देतो’, याचे जिवंत उदाहरण आम्‍ही अनुभवले. सौ. नम्रताताईंच्‍या मेंदूमध्‍ये कर्करोगाची गाठ झाली असूनही त्‍यांना अजिबात डोकेदुखी नव्‍हती, म्‍हणजेच ‘गुरुदेवांनी त्‍यांना प्रारब्‍ध सहन करण्‍यासाठी केवढ्या मोठ्या प्रमाणात बळ दिले’, हे आम्‍हा सर्वांच्‍याच लक्षात आले.

ईश्‍वराने मला त्‍यांच्‍यासारखी प्रेमळ नणंद, साधक मैत्रीण (सखी) दिली’, यासाठी ईश्‍वरचरणी पुष्‍कळ कृतज्ञता !’

(सर्व सूत्रांचा दिनाक ११.८.२०२३)