
सांगली – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्या समर्थनार्थ पलूस येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. पलूस बसस्थानकापासून चालू झालेला मोर्चा शिवतीर्थावर समाप्त झाला. समारोपप्रसंगी पू. भिडेगुरुजी यांच्या छायाचित्रास दुग्धाभिषेक करण्यात आला. अंकलखोप येथील श्री. अतुल पाटील(सर) यांनी पू. गुरुजीच्या कार्याविषयी माहिती दिली. श्री. रोहित पाटील यांनी पू. भिडेगुरुजी यांच्यावरील आरोप कसे चुकीचे आहेत ? त्याची माहिती दिली. मोर्चात ५ वर्षांची लहान मुलगी पांढरी टोपी घालून सहभागी झाली होती, तसेच पुणदी येथील एक अपंग व्यक्ती श्री. तानाजी जोशी मोर्चात सहभागी होते. मोर्चासाठी ५०० हून अधिक धारकरी, हिंदुत्वनिष्ठ यांची उपस्थिती होती.
तासगाव – येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने शिवतीर्थावर पू. भिडेगुरुजी यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक करण्यात आला.


सौंदळ (राजापूर) येथे आढळले अश्मयुगीन कातळशिल्प
अमरावती मध्यवर्ती बसस्थानकाची दुरवस्था पाहून परिवहनमंत्री प्रताप सरनाईक संतप्त !
यावर्षी देशात ९०, तर महाराष्ट्रात ९८ टक्के पावसाची शक्यता !
थोडक्यात महत्त्वाचे : ०८.०६.२०२६
पुणे येथे हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे धर्मांतर करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ !
तीर्थक्षेत्र पैठण येथे ८ नाल्यांचे दुर्गंधीयुक्त आणि रसायनमिश्रित पाणी गोदावरी नदीपात्रात !