पू. भिडेगुरुजींची अपकीर्ती करणार्‍यांवर कारवाई करण्याची समर्थकांची पुणे जिल्हाधिकार्‍यांना निवेदनाद्वारे मागणी !

पुणे येथे पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेकाची अनुमती नाकारली !

पू. संभाजीराव भिडेगुरुजी

पुणे – पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्या समर्थनार्थ ५ ऑगस्ट या दिवशी बालगंधर्व चौकामध्ये दुग्धाभिषेक करण्यात येणार होता. त्यासाठी त्यांच्या समर्थकांनी पोलिसांकडे अनुमती मागितली होती; परंतु पोलिसांनी अमित शाह यांच्या दौर्‍याचे कारण देत ही अनुमती नाकारली आहे. त्यामुळे भिडे समर्थकांनी पुणे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले. त्यात पू. संभाजीराव भिडेगुरुजींची अपकीर्ती आणि अपप्रचार थांबवावा, अशी मागणी केलेली आहे. त्यांच्याविरुद्ध कारस्थान रचले जात आहे. शांततेच्या मार्गाने आम्ही जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देत आहोत. त्या कारस्थानाच्या पाठीमागे असणार्‍या लोकांवर जिल्हाधिकार्‍यांनी कारवाई करावी, अशी मागणी त्यांच्या समर्थकांनी निवेदनाद्वारे केलेली आहे. या ठिकाणी समर्थकांनी सामूहिक प्रार्थनाही केली.