शिरोली (कोल्हापूर) येथे हिंदु फळविक्रेत्यास धर्मांध मुसलमानांकडून मारहाण  !

(प्रतिकात्मक चित्र)

शिरोली (जिल्हा कोल्हापूर) – शिरोली फाट्यावर फळविक्रीचा व्यवसाय करणार्‍या एका हिंदु फळविक्रेत्यास ३ ऑगस्टला रात्री १०.३० वाजता धर्मांध मुसलमानांनी बेदम मारहाण केली. ‘तू बाहेरून आला आहेस. तुला मारून टाकतो’, अशी धमकी त्यांनी हिंदु विक्रेत्यास दिली. ही घटना कळताच श्री शिवप्रितष्ठान हिंदुस्थान, बजरंग दल, तसेच अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी तेथे तात्काळ उपस्थित झाले, तसेच पोलीसही उपस्थित झाले. हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रतिनिधींनी या फळविक्रेत्यास तात्काळ रुग्णालयात उपचार दिले आणि सर्वजण त्याच्या पाठीशी असल्याचे सांगितले. या घटनेमुळे शिरोलीत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

संबंधित फळविक्रेत्याच्या तक्रारीवरून शिरोली औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात ८ ते १० धर्मांध मुसलमानांवर गुन्हा नोंद झाला आहे. या तक्रारीत भ्रमणभाष, ब्ल्यू-टूथ आणि ‘स्मार्ट वॉच’ यांची चोरी झाल्याची नोंदही करण्यात आली आहे. या प्रकारानंतर ४ ऑगस्टला हिंदु संघटनांच्या वतीने हिंदु विक्रेत्यास पोलीस संरक्षण द्यावे, तसेच मारहाण करणार्‍यांवर तात्काळ कठोर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन शिरोली औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात देण्यात आले.

यापुढे हिंदु विक्रेत्यास व्यवसाय करण्यास आडकाठी आणल्यास त्याला हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते जशास-तसे उत्तर देतील, अशी चेतावणी शिरोली-पुलाची येथील हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते श्री. मनोज शिंदे यांनी दिली आहे.

संपादकीय भूमिका

हिंदूबहुल देशात धर्मांधांचा वाढता उद्दामपणा !

प्रत्येक व्यवसायात धर्मांधांचा वाढता उद्दामपणा थांबवण्यासाठी हिंदूंनी संघटितपणा दाखवला पाहिजे !