छत्रपती संभाजीनगर येथे स्‍वतःचे मृत्‍यू प्रमाणपत्र घेऊन महिला पोचली पंचायत समितीत !

केवळ पैशांसाठी हा सर्व खटाटोप करणारे महिला जिवंत असतांनाही खोट्या कागदपत्रांद्वारे मृत्‍यूचे प्रमाणपत्र देणार्‍यांवर कठोर कारवाई करायला हवी.

मनसेचे नेते अभिजित पानसे यांनी घेतली संजय राऊत यांची भेट !

मनसेचे नेते अभिजित पानसे यांनी ६ जुलै या दिवशी उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची दैनिक ‘सामना’च्‍या कार्यालयात भेट घेतली. तत्‍पूर्वी त्‍यांनी गाडीने एकत्र प्रवास केला.

अजित पवार मुख्‍यमंत्री होणार असल्‍याच्‍या अफवा यशस्‍वी होणार नाहीत ! – उदय सामंत, उद्योगमंत्री

जितदादा सरकारमध्‍ये सहभागी झाल्‍यानंतर ते मुख्‍यमंत्री होणार आहेत, असे कोण पिकवत आहे, त्‍यांचे मनसुबे यशस्‍वी होणार नाहीत, असे मत राज्‍याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ६ जुलै या दिवशी पत्रकार परिषदेत केले.

शरद पवार गटाच्‍या राष्‍ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांचे निलंबन !

शरद पवार गटाच्‍या राष्‍ट्रवादी काँग्रेस पक्षाच्‍या कार्यकारिणीची बैठक ६ जुलै या दिवशी देहली येथे झाली. या बैठकीमध्‍ये राष्‍ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना पक्षातून निलंबित करण्‍यात आले आहे.

अदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्रीपद देण्‍यास शिवसेनेच्‍या आमदारांचा विरोध !

शिवसेनेचे आमदार भरतशेठ गोगावले यांसह भाजपच्‍या ६ आमदारांनी अदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद देण्‍यास विरोध दर्शवला आहे.

गोहत्‍येच्‍या निषेधार्थ वासुली (जिल्‍हा पुणे) येथील बाजारपेठ बंद !

असाच संघटितपणा दाखवल्‍यास यापुढे असे कृत्‍य करण्‍याचे धाडस कुणी करणार नाही. यावरूनच संघटितपणाचे महत्त्व लक्षात येते !

वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून ठाकरे गटाला १५ दिवसांत भूमिका सांगण्‍याचे आवाहन !

प्रकाश आंबेडकर एम्.आय.एम्.शी युती करणार असल्‍याचीही चर्चा आहे. या पार्श्‍वभूमीवर त्‍यांचे हे विधान महत्त्वाचे मानले जात आहे.

मराठवाड्यातील राष्‍ट्रवादीच्‍या ११ पैकी ७ आमदारांचा अजित पवार यांना पाठिंबा !

राष्‍ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेल्‍या गटबाजीनंतर आता २ गट आमने-सामने पहायला मिळत आहेत. त्‍यामुळे आमदारांची जमवाजमव दोन्‍ही गटांकडून करण्‍यात येत आहे.

वर्ष २०२४ पर्यंत एकनाथ शिंदेच मुख्‍यमंत्री ! – चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्‍यक्ष, भाजप

मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे हेच वर्ष २०२४ पर्यंत मुख्‍यमंत्री रहाणार आहेत, असे स्‍पष्‍ट प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्‍यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे ६ जुलै या दिवशी पत्रकारांशी बोलतांना केले. ‘उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांनी केलेल्‍या विधानावर विश्‍वास ठेवला पाहिजे.

पुणे शहर पोलीस कादीर शेख याच्‍यावर महिलेवर लैंगिक अत्‍याचार प्रकरणी गुन्‍हा नोंद !

शहर पोलीस दलाच्‍या गुन्‍हे शाखेतील पोलीस कर्मचारी कादीर शेख, समीर पटेल आणि २ अनोळखी व्‍यक्‍ती यांच्‍याविरुद्ध लैंगिक अत्‍याचार केल्‍याविषयी मुंढवा पोलीस ठाण्‍यात अनुसूचित जाती-जमाती (अत्‍याचार प्रतिबंधक) अधिनियमानुसार गुन्‍हा नोंदवण्‍यात आला आहे.