मुंबई – शिवसेना-भाजप यांना पाठिंबा देऊन मंत्रीपदाची शपथ घेणार्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या अदिती तटकरे यांना रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यास शिवसेनेच्या रायगडमधील आमदारांनी विरोध केला आहे. शिवसेनेचे आमदार भरतशेठ गोगावले यांसह भाजपच्या ६ आमदारांनी अदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद देण्यास विरोध दर्शवला आहे. याविषयी भरतशेठ गोगावले म्हणाले, ‘‘आम्ही शिवसेना-भाजप युतीमधून निवडून आलो आहोत. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मतदान केलेले नाही. पूर्वीच मला रायगडचे पालकमंत्रीपद द्यायचे निश्चित झाले होते.’’
Aditi Tatkare यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच Bharat Gogavale यांनी दर्शवला विरोध; युतीत वादाची ठिणगी#adititatkare #bharatgogavale #ncp #maharashtrapolitics pic.twitter.com/RU6zref7AL
— ZEE २४ तास (@zee24taasnews) July 6, 2023