बंगालमध्ये महिलांच्या जमावाने २ आदिवासी महिलांना मारहाण करून केले अर्धनग्न !

बंगालमध्ये गेल्या काही मासांमध्ये अशा प्रकारच्या घटना घडल्याचे उघड आले असतांना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, माकप आदी राजकीय पक्ष आणि महिला संघटना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना जाब विचारतांना दिसत नाहीत, हे लक्षात घ्या !

गोवा पावसाळी अधिवेशन : रोजगार निर्मितीमध्ये विसंगती असल्याच्या कारणावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले

परप्रांतियांना अधिक रोजगार दिल्यावरून ‘सत्ताधार्‍यांना गोमंतकियांची चिंता नाही’, असा आरोप गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी केला.

सिंधुदुर्ग : कुडाळ येथे विजेच्या धक्क्याने वीजवितरणचे कर्मचारी गंभीर घायाळ

वीज वितरण आस्थापनाकडे कोणतीही आपत्कालीन यंत्रणा नसल्याने अपघातग्रस्त कर्मचारी श्री. फाले हे ४५ मिनिटे खांबावरच लोंबकळलेल्या स्थितीत होते !

सिंधुदुर्ग जिल्ह्यात २४ जुलैपर्यंत अतीमुसळधार पावसाची चेतावणी

पावसामुळे आतापर्यंत जिल्ह्यात १ व्यक्तीचा, तर ४ गुरांचा मृत्यू झाला आहे. ६ सार्वजनिक मालमत्तांची हानी झाली आहे. पुराचे पाणी घरात घुसल्याने सध्या ३९ कुटुंबे स्थलांतरित करण्यात आली आहेत.

गोव्यात पावसाने ७५ इंचांचा टप्पा ओलांडला !

पेडणे आणि सत्तरी तालुक्यांतील नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या २४ घंट्यांत सरासरी ८७.१ मि.मी. पावसाची नोंद झाली असून फोंडा येथे सर्वाधिक ११३ मि.मी., तर पेडणे येथे ११०.८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

गुजरात दंगलीवरील वादग्रस्त माहितीपटासाठी बीबीसीवर कारवाई करण्याचे विधेयक गोवा विधानसभेत संमत

मुख्यमंत्र्यांनी ‘हा माहितीपट सार्वजनिक करू शकत नाही. त्यावर बंदी आहे’, याची जाणीव करून देतांना म्हटले की, ‘देशाच्या पंतप्रधानांना अवमानित केले जात आहे, त्याचे काही नाही. सर्व विरोधक मात्र बीबीसीला पाठिंबा द्यायला उभे रहात आहेत !’

वेद-उपनिषदे इत्यादी अध्यात्मविषयक ग्रंथांचे महत्त्व

‘युद्ध ही तात्कालिक बातमी असते. पुढे ५० – ६० वर्षांतच मोठमोठ्या युद्धांचा इतिहास विसरला जातो, उदा. पहिले आणि दुसरे महायुद्ध आणि त्याआधीची सर्व युद्धे. याउलट अध्यात्मविषयक वेद-उपनिषदे इत्यादी ग्रंथ चिरकाल टिकून आहेत.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

आपत्ती निवारण दल हवेच !

नेहमीच मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार्‍या रायगडसह कोकण पट्ट्यातही दरडी कोसळण्‍याच्‍या घटना पावसात हमखास घडतातच. वर्ष २०१६ मध्‍ये येथील सावित्री नदीवरील पूल तुटून बस पाण्‍यात पडून मोठी दुर्घटना घडली होती.