चोरीचा होता संशय !
कोलकाता (बंगाल) – बंगालमधील मालदा जिल्ह्यात महिलांच्या जमावाने २ आदिवासी महिलांना मारहाण करून त्यांना अर्धनग्न केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना १९ जुलैची असून त्याचा व्हिडिओ आता सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. महिलांच्या एका टोळक्याने २ महिलांना घेरल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. या महिलांचे केस ओढले जात असून त्यांना चप्पलने मारहाण केली जात आहे. यानंतर त्यांचे कपडेही फाडण्यात आल्याचे दिसून येत आहे. या २ महिलांवर चोरीचा आरोप करण्यात आला होता. सध्या याविषयी पोलिसांकडून अधिकृत माहिती आलेली नाही.
‘कपड़े फाड़े, चप्पलें बरसाईं… दो महिलाओं को निर्वस्त्र कर पीटा’, भीड़ की बर्बरता से बंगाल शर्मसार#WestBengal #WestBengalViolence #Malda https://t.co/lG50XFOkeD
— रिपब्लिक भारत (@Republic_Bharat) July 22, 2023
भाजपच्या माहिती आणि तंत्रज्ञान शाखेचे प्रमुख अमित मालवीय यांनी हा व्हिडिओ सामाजिक माध्यमातून प्रसारित केला आहे. त्यांच्या मते ही घटना मालदातील पाकुआ हाट भागात घडली. मालवीय यांनी आरोप केला की, जेव्हा त्यांना मारहाण केली जात होती आणि त्यांचे कपडे फाडले जात होते, तेव्हा पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली होती.
संपादकीय भूमिकाबंगालमध्ये गेल्या काही मासांमध्ये अशा प्रकारच्या घटना घडल्याचे उघड आले असतांना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, माकप आदी राजकीय पक्ष आणि महिला संघटना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना जाब विचारतांना दिसत नाहीत, हे लक्षात घ्या ! या ठिकाणी जर भाजपचे सरकार असते, तर हे सर्व विरोधी पक्ष संघटित होऊन त्याविरोधात उभे ठाकले असते ! |