शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक स्तरांवरील कार्य

‘शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक स्तरांवर कार्य करणारे दुसर्‍या स्तरावरचे कार्य करू शकत नाहीत; पण आध्यात्मिक स्तरावरच्यांचे कार्य सूक्ष्म स्तरावरील असल्याने त्यांचे कार्य सर्व स्तरांवर होते. त्यांचे वैशिष्ट्य हे की, विशेष काही करावे न लागता त्यांचे सर्व कार्य ईश्वरी कृपेमुळे होते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

गोवा : आज प्रारंभ होणार्‍या चौथ्या ऊर्जा संक्रमण कार्यकारी गटाच्या बैठकीत ६ प्राधान्ये

या चौथ्या बैठकीतील महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंत्रीस्तरीय निवेदनाच्या मसुद्यावर होणारी सविस्तर चर्चा ही आहे. बैठकीला जोडूनच विविध अन्य कार्यक्रमांचे (साइड इव्हेंट्सचे) आयोजन करण्यात आले आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे ३ मासांत महाराष्‍ट्रात ९५ जण मृत्‍यूमुखी !

नैसर्गिक आपत्तीमुळे मार्च ते मे २०२३ या कालावधीत महाराष्‍ट्रातील ९५ जण मृत्‍यूमुखी पडले आहेत, अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी १८ जुलै या दिवशी विधानसभेत दिली.

मंदिर रक्षणासाठी संघटित होण्‍याचा वसई येथील मंदिर विश्‍वस्‍तांचा निर्धार !

१६ जुलै या दिवशी हिंदु जनजागृती समिती आणि मंदिर महासंघ यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने बैठक पार पडली. बैठकीत वसई, विरार, नालासोपारा परिसरातील २९ मंदिरांचे विश्‍वस्‍त आणि प्रतिनिधी उपस्‍थित होते.

सोमवती अमावास्‍येच्‍या निमित्ताने लाखो भाविकांनी घेतले जेजुरीतील खंडोबाचे दर्शन !

सोमवती अमावास्‍येचा पर्वकाळ असल्‍याने जेजुरीमध्‍ये ‘सोमवती यात्रा’ भरली होती. सोमवारी उगवत्‍या सूर्याला अमावास्‍या असली की, त्‍या दिवशी जेजुरीच्‍या खंडोबा देवाची सोमवती अमावास्‍या यात्रा भरते.

‘ऑनलाईन’ कपडे मागवणार्‍या महिलेची ३२ सहस्र रुपयांची फसवणूक

महिलेने ‘ड्रेस डॉट इन’ या ‘फेसबूक साईट’वरून ‘ऑनलाईन’ पद्धतीने कपडे मागवले होते. कपड्यांच्‍या गठ्ठ्यातून (पार्सलमधून) ‘ड्रेस’ऐवजी ‘फॉल’ (साडीला खालच्‍या बाजूने लावलेले कापड) लावलेली साडी आणि चिंध्‍या आल्‍या.

‘बाईपणा’चे श्रेष्‍ठत्‍व दाखवून द्या !

सध्‍या सर्वत्र ‘बाईपण भारी देवा’ हा मराठी चित्रपट पहाण्‍यासाठी चित्रपटगृहांमध्‍ये महिलांची गर्दी पहायला मिळत आहे. प्रत्‍येक महिलेच्‍या तोंडी याच चित्रपटाचे नाव आहे. एका चित्रपटाच्‍या निमित्ताने का होईना; पण सर्वत्रच्‍या महिलांचे संघटन पहायला मिळत आहे.

हिंदू जागे होत आहेत !

कोल्‍हापूरमधील एका महाविद्यालयात शिक्षकाने विद्यार्थ्‍याला त्‍याने गळ्‍यात घातलेली ‘जय श्रीराम’ लिहिलेली भगवी पट्टी काढण्‍यास सांगितल्‍यावर त्‍याने ‘वर्गातील विद्यार्थिंनींनी घातलेला हिजाब काढण्‍यास सांगा, तरच पट्टी काढतो’, असे सांगितले.

गदारोळ करणार्‍या लोकप्रतिनिधींना कधीच निवडून देऊ नका. लोकप्रतिनिधी समाजाला आदर्शच असले पाहिजेत !

‘गोव्‍यातील वेलींग-प्रियोळ-कुंकळ्‍ये पंचायतीच्‍या १६ जुलै २०२३ या दिवशी झालेल्‍या ग्रामसभेत विविध विषयांवरून गदारोळ झाला.