मुंबई, १८ जुलै (वार्ता.) – नैसर्गिक आपत्तीमुळे मार्च ते मे २०२३ या कालावधीत महाराष्ट्रातील ९५ जण मृत्यूमुखी पडले आहेत, अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी १८ जुलै या दिवशी विधानसभेत दिली. याविषयी धुळे येथील आमदार कुणाल पाटील यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नावर सभागृहात चर्चा होऊ शकली नाही; मात्र लेखी उत्तरात ही माहिती देण्यात आली आहे.
या उत्तरात अनिल पाटील यांनी एप्रिल आणि मे मासांत अवेळी पावसामुळे शेतीची हानी झाली आहे. ई पंचनामा कार्यप्रणाली पूर्णपणे विकसित झाली नसल्यामुळे अद्यापया कार्यप्रणालीद्वारे पंचनामे चालू करण्यात आलेले नसल्याचे सांगितले.