वढुबुद्रुक येथून ज्‍वाला सांगलीत दाखल !

श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलीदानमास

ज्‍वालेला पुष्‍पहार अर्पण करतांना भाजप आमदार श्री. सुधीर गाडगीळ

सांगली, ५ मार्च (वार्ता.) – श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानच्‍या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्‍या बलीदानाच्‍या स्‍मरणार्थ बलीदानमासाच्‍या अखेरीस प्रतिकात्‍मक अंत्‍ययात्रा काढून छत्रपती संभाजी महाराज यांच्‍या प्रतिकात्‍मक चितेला अग्‍नि देण्‍यात येतो. या चितेसाठी छत्रपती संभाजी महाराज यांच्‍या वढुबुद्रुक येथील समाधीपासून धारकरी धावत ही ज्‍वाला घेऊन येतात. ही ज्‍वाला ५ मार्च या दिवशी सांगलीत दाखल झाली. प्रारंभी सांगलीवाडी येथे ज्‍वाला दाखल झाल्‍यावर ज्‍वालेचे स्‍वागत करण्‍यात आले. या प्रसंगी भाजपचे आमदार श्री. सुधीर गाडगीळ यांनी ज्‍वालेला हार अर्पण केला. या प्रसंगी पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्‍यासह नगरसेवक श्री. लक्ष्मण नवलाई यांची प्रमुख उपस्‍थिती होती. सर्वश्री हणमंतराव पवार, राजू पुजारी, नितीन काळे यांस अन्‍य धारकरी मोठ्या संख्‍येने उपस्‍थित होते.

ज्‍वाला घेऊन येणारे धारकरी

ही ज्‍वाला मारुति मंदिर येथे ठेवण्‍यात आली असून ज्‍यांना हवी त्‍यांनी ती घेऊन जावी, असे आवाहन श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानच्‍या वतीने करण्‍यात आले आहे.