निधीतून ऐरोली मतदारसंघात विकास होणार
वाशी – आमदार गणेश नाईक यांच्या पाठपुराव्याने नवी मुंबईतील दलित वस्त्यांमध्ये ४ कोटी रुपये खर्चाची कामे करण्यात येणार आहेत. राज्याच्या सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य विभागाकडून हा निधी संमत करून घेण्यासाठी गणेश नाईक यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.
गणेश नाईक यांनी अलीकडेच मतदारसंघासाठी १० कोटी रुपयांचा विशेष निधी संमत करून आणला आहे. त्यामधून रस्त्याचे काँक्रिटीकरण, स्कायवॉक, मासळी मार्केट, नागरी आरोग्य केंद्र, शाळेत वाढीव मजले बांधणे, रात्रनिवारा केंद्र, पाणी वितरण व्यवस्था अशा विविध नागरी सुविधा मतदासंघात विविध ठिकाणी उपलब्ध होणार आहेत.
आता ४ कोटी रुपयांच्या निधीतून ऐरोली मतदारसंघातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध वस्त्यांचा विकास होणार आहे. तेथे मूलभूत सुविधा पुरवण्यात येणार आहेत. हा निधी प्राप्त करून घेण्यासाठी गणेश नाईक यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी केली होती. या निधीतून पुढील विकासकामे करण्यात येणार आहेत.