केंद्र आणि राज्य शासनाविषयीच्या निश्चितीमुळे उद्योजकांची महाराष्ट्रात गुंतवणूक ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे

मुंबई – दावोस (स्वित्झर्लंड) तेथे ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ (जागतिक आर्थिक मंच) मध्ये ५५ देशांतील उद्योजकांनी महाराष्ट्रात गुंतवणूक केली. केंद्र आणि राज्य शासनाविषयीच्या निश्चितीमुळे उद्योजकांनी महाराष्ट्रात गुंतवणूक केली आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलतांना केले.

या वेळी एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘या मंचावर मला ‘पर्यावरणाचा र्‍हास थांबवण्यासाठीच्या उपाययोजना’ हा विषय मांडण्याची संधी मिळाली. महाराष्ट्रात यासाठी राबवण्यात येणार्‍या प्रकल्पांची मी माहिती दिली. येथे १ लाख ५५ सहस्र कोटी रुपयांच्या उद्योगांसाठी करार झाले. अनेक उद्योजक महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी आग्रही आहेत.’’