नैताळे (जिल्हा नाशिक) येथे लाच मागणार्‍या ग्रामसेवकांसह दोघांना अटक !

लाच घेतल्याविना कामे न करणारी प्रशासकीय यंत्रणा !

प्रतिकात्मक छायाचित्र

नाशिक – जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील नैताळे येथील मतोबा यात्रोत्सव समारोपाच्या पूर्वसंध्येला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २० जानेवारी या दिवशी ७ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना ग्रामसेवकासह दोघांना रंगेहात पकडून अटक केली आहे. राजेंद्र दहिफळे असे ग्रामसेवकाचे, तर जगन्नाथ पाठक आणि सागर आहेर अशी त्याच्या साथीदारांची नावे आहेत. या तिघांनी पाळणा लावण्यासाठी ३१ सहस्र रुपयांच्या लाचेची मागणी तक्रारदाराकडे केली होती. तडजोडीअंती ७ सहस्र रुपये द्यायचे ठरले.