आज घाटकोपर येथे हिंदु जनसंघर्ष मोर्चा !

‘लव्ह जिहाद’, ‘लँड जिहाद’ आणि ‘धर्मांतर’ याविरोधात सरकारने कठोर कायदे करावेत, या एकमुखी मागणीसाठी घाटकोपर येथे हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने आज भव्य हिंदु जनसंघर्ष मोर्चा काढण्यात येणार आहे.

• वेळ : दुपारी ४.३० वाजता

• आरंभ : सर्वोदय हॉस्पिटल चौक, एल्.बी.एस्. मार्ग, घाटकोपर (प.)

•  समारोप : छत्रपती शिवाजी महाराज मैदान, विक्रोळी (प.)

• संपर्क क्र. : ८०८०२०८९५८

अधिकाधिक हिंदूंनी या मोर्च्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.


‘सेल्फी पाँईट’मध्ये छायाचित्र काढून घाटकोपर येथील हिंदु जनसंघर्ष मोर्च्यात सहभागी होण्याचा धर्मप्रेमींचा निर्धार !

‘सेल्फी पाँईट’ मध्ये छायाचित्र काढून घेतांना धर्मप्रेमीं

मुंबई – हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने घाटकोपर येथे २२ जानेवारी या दिवशी ‘लव्ह जिहाद’, ‘लँड जिहाद’ आणि ‘धर्मांतर’ या विरोधात हिंदु जनसंघर्ष मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. मोर्च्याला पाठिंबा देण्यासाठी विक्रोळी येथील अमृतनगर आणि घाटकोपर रेल्वेस्थानक येथे ‘सेल्फी पाँईट’ ठेवण्यात आले होते. अनेक हिंदु धर्मप्रेमींनी या ‘सेल्फी पाँईट’ वर स्वत:चे छायाचित्र काढून मोर्च्यात सहभागी होणार असल्याचे सांगितले. यामध्ये युवक-युवती यांचाही सहभाग मोठ्या प्रमाणात होता.