घरकुल घोटाळ्यातील माजी आमदार सुरेश जैन यांना जामीन !

२९ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. घरकुल योजनेतील ५ सहस्र घरांपैकी केवळ दीड सहस्र घरे बांधण्यात आली होती.

हिंदुद्वेषाचे आंतरराष्ट्रीय धागेदोरे !

वास्तविक ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट सत्य इतिहासावर आधारित आहे. मग अशा चित्रपटाला विरोध करणे, ही इतिहासाची गळचेपी नव्हे का ?  एरव्ही ‘इतिहासाची गळचेपी होते’, अशी ओरड करणारे लॅपिड प्रवृत्तीवालेच ‘द कश्मीर फाइल्स’ला विरोध करून इतिहासाची गळचेपी करत असतात, हे लक्षात घेतले पाहिजे.

आनंदी जीवन जगण्यासाठी साधना करणे आवश्यक ! – शशांक मुळे, सनातन संस्था

सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे. आजच्या  धकाधकीच्या जीवनात प्रत्येक जण आनंद शोधत असतो, तो मिळवून आनंदी जीवन जगायचे असेल, तर प्रत्येकाने साधना करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे श्री. शशांक मुळे यांनी केले.

प्रार्थना आणि श्रद्धेचे बळ !

लंपी रोगापासून गायींचा बचाव होण्यासाठी श्री. महादेव देसाई यांनी द्वारकाधीश श्रीकृष्णाला नवस केला. ‘जर माझ्या गायी वाचल्या, तर मी तुझ्या दर्शनाला माझ्या २५ गायींसह चालत येईन.’ जेव्हा सगळ्याच गायी वाचल्या, तेव्हा ते द्वारकाधीश मंदिरात दर्शनासाठी (अंतर ४५० कि.मी.) आपल्या गायींसमवेत आले.

ब्रिटनमधील मुसलमानांचा ‘लोकसंख्या जिहाद’ जाणा !

ब्रिटनमध्ये ख्रिस्त्यांची लोकसंख्या वेगाने अल्प होत असून मुसलमानांची लोकसंख्या वाढत आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे ख्रिस्त्यांची लोकसंख्या ५० टक्क्यांहून अल्प झाली आहे.

पालेभाज्या काढणीस आल्यावर मुळासकट उपटू नयेत !

हिवाळ्यामध्ये आपण सर्व प्रकारच्या पालेभाज्यांची लागवड करू शकतो. पालेभाज्या साधारणपणे एक ते सव्वा मासात काढणीला येतात. पालेभाज्या काढतांना मुळासकट न उपटता त्यांची केवळ पाने हाताने खुडून किंवा कात्रीने कापून घ्यावीत.

गोंड आदिवासींना ‘हिंदु वारसा हक्क’ कायदा लागू असल्याचे स्पष्ट करणारा छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निवाडा !

आदिवासी किंवा त्यांच्यासारखे अनेक मागासवर्गीय घटक हे हिंदु धर्माचे आचरण करतात आणि स्वतःला हिंदु समजतात.

स्वास्थ्यकर आहाराचे २१ मंत्र अवलंबा आणि निरोगी रहा !

आयुर्वेदाचे नियम आयुर्वेदाच्याच परिभाषेत जाणून घ्यायला हवेत. ते शाश्वत आणि एतद्देशीय (मूळचे) असल्याने अत्यंत उपयुक्त आहेत, हे काळाच्या कसोटीवर सिद्ध झाले आहे.

गोवर आला असल्यास पाळायचे पथ्य

गोवराचा पुरळ अंगावर दिसू लागल्यास मुलाला शाळेत न पाठवता घरीच ठेवावे. शक्यतो त्याला इतरांच्या संपर्कात येऊ देऊ नये. दूध आणि दुधाचे पदार्थ टाळावेत. अल्पाहारासाठी शिरा, उपमा, घावन किंवा भाकरी, तर जेवणामध्ये वरणभात आणि तिखट अन् तेलकट नसलेली भाजी असावी.

भारतात परकीय गुंतवणूक वाढण्यामागील कारण

भारतात वर्ष २०२१ मध्ये एकाच वर्षात ८४ अब्ज डॉलर्सची परकीय गुंतवणूक झाली. जगभरात कोरोना महामारीचे संकट असतांना भारतात झालेली ही मोठी गुंतवणूक हा एक मोठा विक्रमच आहे.