घरकुल घोटाळ्यातील माजी आमदार सुरेश जैन यांना जामीन !

सुरेश जैन

जळगाव – घरकुल घोटाळ्यातील मुख्य संशयित आरोपी माजी आमदार सुरेश जैन यांना वैद्यकीय कारणास्तव जामीन संमत झाला आहे. त्यांनी उच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका केली होती. सत्र न्यायालयाने त्यांना दोषी ठरवून ७ वर्षांची शिक्षा आणि १०० कोटी रुपयांचा दंड दिला होता. त्यांतील त्यांनी ५ वर्षे शिक्षा भोगली.

२९ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. घरकुल योजनेतील ५ सहस्र घरांपैकी केवळ दीड सहस्र घरे बांधण्यात आली होती. बांधकाम व्यावसायिक आणि अधिकारी यांच्याशी संगनमत करून हा घोटाळा केल्याचा आरोप जैन यांच्यावर आहे. तत्कालीन पालिका आयुक्त प्रवीण गेडाम यांनी तक्रार केली होती.