राज्यात ११ ते १४ डिसेंबरला मुसळधार पावसाची शक्यता !

चक्रीवादळामुळे नाशिक, जळगाव, धुळे येथील काही भागांपर्यंत पावसाची शक्यता राहील. पुद्दुचेरी आणि श्रीहरिकोटा येथे ८ ते ११ डिसेंबर या कालावधीत सिद्ध होणार्‍या ‘मंडौस (MANDOUS)’ चक्रीवादळामुळे पावसाची शक्यता आहे.

तळोजा येथे धर्मांधाकडून ५ वर्षीय मुलीवर अत्याचार !

वातानुकूलित यंत्र दुरुस्त करण्यासाठी आलेल्या अक्तर हुसेन याला इमारतीतील ५ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्याने ५ वर्षीय मुलीला फसवून उद्वाहनात (लिफ्टमध्ये) नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

हिंदु राष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी तळोदा येथे ११ डिसेंबरला हिंदु राष्ट्र-जागृती सभा ! – डॉ. सतीश बागुल, हिंदु जनजागृती समिती

हिंदूंवर होणार्‍या अन्यायांना वाचा फोडण्यासाठी, तसेच हिंदु राष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे नियोजन !

संभाजीनगर महापालिकेने अहवाल सादर करणे बंद करून पाणी द्यावे ! – खंडपिठाचे वक्तव्य

जे काम प्रशासन आणि मंत्री यांना करायला हवे, ते न्यायालयाला सांगावे लागणे, हे सरकारला लज्जास्पद !

श्रद्धा वालकर हिच्या वडिलांनी घेतली गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट, पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप !

प्रारंभीपासून वसईतील तुळींज पोलीस ठाणे आणि माणिकपूर पोलीस ठाणे येथील पोलिसांच्या असहकार्यामुळे मला पुष्कळ त्रास सहन करावा लागला. याविषयी अन्वेषण व्हावे. पोलिसांनी सहकार्य केले असते, तर माझी मुलगी जिवंत असती.

‘लव्ह जिहाद’ प्रकरणाच्या निषेधार्थ ‘मोरगिरी (सातारा) बंद’

मोरगिरी (पेठशिवापूर) येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ ८ डिसेंबर या दिवशी ‘मोरगिरी बंद’ची हाक देण्यात आली होती. या दिवशी मोरगिरी विभागातील वाहतूकदार, व्यापारी, दुकानदार यांनी संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवत १०० टक्के बंद पाळला.

(म्हणे) ‘भारतातील हिंदू संपत असल्याने आम्ही मुंबई येथे आक्रमणे करू !’

‘हॅलो, मुंबई कंट्रोल रूम, भारतातील हिंदू संपत चालले आहेत. आता आम्ही मुंबई येथील छत्रपती शिवाजी टर्मिनस, दादर आणि कुर्ला येथे येऊन आक्रमणे करणार आहोत. घोडबंदरमार्गे मुंबईत येऊ’, अशी भ्रमणभाषद्वारे पोलिसांना धमकी दिली.

हुतात्मा बाबू गेनू जलाशयात ३ वर्षांपासून मत्स्यबीज सोडले नाही !

डिंभे धरणाजवळील हुतात्मा बाबू गेनू जलाशयात ३ वर्षांपासून महाराष्ट्र मत्स्य विकास महामंडळ मुंबई यांनी मासेमारी करण्यासाठी अजून कुणालाही दायित्व दिले नाही, तसेच मत्स्यबीजही सोडले नाही.

‘कल्पवृक्ष हौसिंग वसाहत’ येथील अवैध बांधकाम तात्काळ न हटवल्यास आंदोलन ! – विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांचे महापालिकेत निवेदन

येथील शहापूर हद्दीतील ‘कल्पवृक्ष हौसिंग वसाहत’ येथे चालू असलेल्या अवैध बांधकामाची तक्रार २८ जानेवारी २०२२ ला विश्व हिंदु परिषदेकडून तक्रार करण्यात आली होती.