हिंदु राष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी तळोदा येथे ११ डिसेंबरला हिंदु राष्ट्र-जागृती सभा ! – डॉ. सतीश बागुल, हिंदु जनजागृती समिती

तळोदा – भारतात अल्पसंख्य आयोग, सच्चर आयोग, अल्पसंख्यांक विकास मंत्रालय आहे; मात्र बहुसंख्य हिंदूंना संरक्षण देणारे मंत्रालय आयोग नाही. देशभरात केवळ हिंदूंच्याच मंदिरांचे सरकारीकरण केले जाते; पण मशिदी किंवा चर्चचे सरकारीकरण का नाही ? अल्पसंख्याकांना धर्माच्या आधारावर शैक्षणिक अनुदान, मग बहुसंख्य हिंदूंनी काय अपराध केला आहे ? हे सर्व पहाता भारतात खरोखरच ‘सेक्युलर’ व्यवस्था अस्तित्वात आहे का ? हिंदूंच्या सहस्रो युवतींना उद्ध्वस्त करणारा नवा आतंकवाद म्हणजे ‘लव्ह जिहाद’ ! भारतीय अर्थव्यवस्थेवरील नवे संकट ‘हलाल जिहाद’ यांसारख्या हिंदूंवर होणार्‍या अन्यायांना वाचा फोडण्यासाठी, तसेच हिंदु राष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ११ डिसेंबर या दिवशी माळी समाज मंगल कार्यालय, तळोदा येथे सायंकाळी ५.३० वाजता हिंदु राष्ट्र-जागृती सभा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे नंदुरबार जिल्हा समन्वयक डॉ. सतीश बागुल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सभेच्या प्रचारासाठी १० डिसेंबर या दिवशी सकाळी १० वाजता वाहनफेरी काढण्यात येणार आहे. या फेरीत हिंदूंनी सहभागी व्हावे, तसेच सभेत मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन डॉ. बागुल यांनी केले आहे.