‘लव्ह जिहाद’ प्रकरणाच्या निषेधार्थ ‘मोरगिरी (सातारा) बंद’

वाहतूकदार, व्यापारी, दुकानदार यांच्याकडून १०० टक्के बाजारपेठ बंद

सातारा, ९ डिसेंबर (वार्ता.) – मोरगिरी (पेठशिवापूर) येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ ८ डिसेंबर या दिवशी ‘मोरगिरी बंद’ची हाक देण्यात आली होती. या दिवशी मोरगिरी विभागातील वाहतूकदार, व्यापारी, दुकानदार यांनी संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवत १०० टक्के बंद पाळला. या वेळी मोरगिरी गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. या वेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मोरगिरी येथे उपस्थित होते.