तळोजा येथे धर्मांधाकडून ५ वर्षीय मुलीवर अत्याचार !

तळोजा (नवी मुंबई) – वातानुकूलित यंत्र दुरुस्त करण्यासाठी आलेल्या अक्तर हुसेन याला इमारतीतील ५ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्याने ५ वर्षीय मुलीला फसवून उद्वाहनात (लिफ्टमध्ये) नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. घाबरलेल्या मुलीने आईला याविषयी सांगितले. आईने तात्काळ खाली जाऊन इमारतीतील रहिवाशांच्या साहाय्याने या धर्मांधाला पकडून चोप दिला आणि पोलिसांच्या कह्यात दिले.

संपादकीय भूमिका

अशा धर्मांध नराधमांना कठोर शिक्षा केल्यासच याला आळा बसेल !