साधकांनो, गुरुसेवेत आवड-नावड न जपता ‘शूद्र वर्णाच्या सेवा करण्याने जलद आध्यात्मिक उन्नती होते’, हे लक्षात घेऊन सर्व सेवा करण्याची सिद्धता ठेवा !

साधकांनो, ‘दिसेल ते कर्तव्य’ या भावाने आपल्या गुरूंच्या आश्रमातील शूद्र वर्णाच्या सेवाही आनंदाने करणार्‍या परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवा आणि आपली आध्यात्मिक उन्नती करण्यासाठी दिलेली संधी दवडू नका !’

जो आवडतो सर्वांला । तोचि आवडे देवाला ।।

‘जनसेवेचे व्रत घेऊन जनतेचे दु:ख शीतल करणे, सर्वांना आधार वाटेल, अशी व्यवस्था निर्माण करणे, कुणीही दीन, दुर्बल किंवा उपाशी राहू नये यासाठी सर्वतोपरी त्याग करून मानवता जपणे, सर्वजण साधना करून आनंदात रहातील, अशी राज्यव्यवस्था निर्माण करणे, ही आदर्श राजाची लक्षणे आहेत.

तीर्थ प्राशन केल्याने व्यक्तीला आध्यात्मिक स्तरावरील लाभ होणे

‘तीर्थ प्राशन केल्याने व्यक्तीच्या सूक्ष्म-ऊर्जेवर काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी साधिकांच्या ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ उपकरणाद्वारे चाचण्या करण्यात आल्या.

कोरोना विषाणूमुळे आलेला आपत्काळ म्हणजे ईश्‍वराने मनुष्याला भक्ती करण्यासाठी दिलेली अखेरची संधी असून आपत्काळात तरून जायचे असेल, तर साधनेला पर्याय नाही !

‘संपूर्ण पृथ्वीवर अधर्म आणि पाप वाढले आहे. त्यामुळे ‘कोरोना’ विषाणूची लागण चालू झाली आहे. हे भगवंताचेच नियोजन आहे. अधर्माचा नाश करण्यासाठी आणि धर्माचे रक्षण करण्यासाठी भगवंत वेगवेगळ्या माध्यमातून अधर्माचा आणि पापकर्मींचा नाश करतो. याचेच उदाहरण म्हणजे ‘कोरोना’ हा विषाणू आहे.

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे भक्तांना मार्गदर्शन

संन्यासी भगवंताच्या स्मरणात जीवन व्यतीत करण्यासाठी घरादाराचा त्याग करून ईश्वराच्या स्मरणात रहातो.