जो आवडतो सर्वांला । तोचि आवडे देवाला ।।

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘जनसेवेचे व्रत घेऊन जनतेचे दु:ख शीतल करणे, सर्वांना आधार वाटेल, अशी व्यवस्था निर्माण करणे, कुणीही दीन, दुर्बल किंवा उपाशी राहू नये यासाठी सर्वतोपरी त्याग करून मानवता जपणे, सर्वजण साधना करून आनंदात रहातील, अशी राज्यव्यवस्था निर्माण करणे, ही आदर्श राजाची लक्षणे आहेत. जर राजा असा असेल, तर त्याची प्रजाही तशीच असते. असा कर्तव्यनिष्ठ राजाच देवाला आवडतो आणि देवच त्याचा योगक्षेम वहातो (भार उचलतो).

हिंदु राष्ट्रात देवाला आवडणारे कार्यकर्ते आणि नेते असे असतील ! हल्ली किती कार्यकर्ते आणि नेते असे आहेत ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

जो आवडतो सर्वांला ।
तोचि आवडे देवाला ।। धृ.।।

दीन भुकेला दिसता कोणी ।
घास मुखीचा मुखी घालुनी ।।

दुःख नेत्रीचे घेता पिउनी ।
फोडि पाझर पाषाणाला ।। १ ।।

घेउनि पंगु अपुल्या पाठी ।
आंधळ्याची होतो काठी ।।

पायाखाली त्याच्यासाठी ।
देव अंथरी निज हृदयाला ।। २ ।।

जनसेवेचे बांधुन कंकण ।
त्रिभुवन सारे घेई जिंकुन ।।

अर्पुन आपुले हृद्सिंहासन ।
नित भजतो मानवतेला ।। ३ ।।

(गीतकार – पी. सावळराम)

(कवितेच्या मूळ शुद्धलेखनात पालट केलेला नाही. – संपादक)