ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे भक्तांना मार्गदर्शन

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

१. ‘पुस्तके वाचून किंवा नुसत्या बुद्धीने जगाची अशाश्वतता केव्हाही कळणार नाही. भगवंताविषयी प्रेम वाढले की, ती आपोआप कळू लागेल.

२. भगवंत भक्तांची संकटे नाहीशी करतो, म्हणजे ‘त्यांची प्रापंचिक संकटे दूर करतो’, असे नाही. ती त्याला (भगवंताला) सहज दूर करता येतात; पण तो भक्ताला समाधानात ठेवून संकटे सहन करण्यासाठी शक्ती देतो. भगवंत भक्ताला नेहमी ईश्वराच्या स्मरणात ठेवतो. असे भक्तच पुढे संतपदाला पोचतात.

३. संन्यासी भगवंताच्या स्मरणात जीवन व्यतीत करण्यासाठी घरादाराचा त्याग करून ईश्वराच्या स्मरणात रहातो.

४. आपला प्रत्येक सण आपल्याला भगवंताची आठवण करून देण्यासाठीच आहे.

५. आपण कुणाविषयीही मनात वाईट विचार आणू नयेत. त्यामुळे आपलेच मन गढूळ होते.

६. ‘काय करावे ?’, हे मनुष्याला कळते; पण त्याचे मन त्याला आवरत नाही, म्हणजेच ‘कळते; पण वळत नाही’, अशी त्याची स्थिती असते.’

(साभार : ‘हरि-विजय’, दीपोत्सव २००७)