नागपूर येथे शिकवणीवर्ग शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग !

नागपूर – शहरातील हनुमाननगर येथील माहेश्वरी मँथ शिकवणीचे संचालक शिक्षक अरविंद माहेश्वरी (वय ५२ वर्षे) यांनी गणिताचा सराव घेण्याच्या बहाण्याने एका १५ वर्षीय विद्यार्थिनीशी अश्लील चाळे केले. ही घटना ऑक्टोबर मासाच्या पहिल्या आठवड्यात घडली. या प्रकरणी विद्यार्थिनीच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी माहेश्वरी यांना अटक केली. न्यायालयाने आरोपी शिक्षकाची कारागृहात रवानगी केली आहे.

संपादकीय भूमिका 

असे शिक्षक आदर्श विद्यार्थी काय घडवणार ?