सदरबझार परिसरात अजूनही चोरून जनावरांची हत्या केला जात असून जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री यांनी सदरबझारच्या या अनधिकृत पशूवधगृहांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
सातारा – शहरातील सदरबझार येथील बिस्मिल्लाह आणि मदिना या दोन उपाहारगृहांमध्ये (हॉटेलमध्ये) गोमांस विक्री केली जाते. गेल्याच मासात सातारा नगरपालिकेने कारवाई करत ही दोन्ही उपाहारगृहे बंद केली होती. सातारा नगरपालिकेने काही अटी आणि नियम घालून उपाहारगृह मालकांकडून लेखी लिहून घेऊन उपाहारगृहे चालू करण्यास अनुमती दिली; मात्र या विरोधात स्थानिक नागरिक आक्रमक झाले आहेत.
या उपाहारगृहामध्ये सातारा शहर आणि परिसर येथून मोठ्या प्रमाणात गोमांस खाण्यासाठी लोक येतात. मद्यपी रात्रीच्या वेळी मद्यपान करून या ठिकाणी गोंधळ घालत असल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. मद्यपान करून आरडाओरडा करत स्थानिक नागरिकांच्या निवासस्थानाच्या परिसरात लघुशंका करणे, तेथेच पडून रहाणे अशा घटना घडतात. यामुळे महिला वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या गोष्टी सहन न झाल्यामुळे परिसरातील महिलांनी उपाहारगृह मालकाची कानउघाडणी करत उपाहारगृहासमोर निषेध नोंदवला. पालिका प्रशासन आणि पोलीस यांनी हे उपाहारगृह तात्काळ बंद करावे, अशी मागणी स्थानिकांनी केली असून याविषयी तीव्र आंदोलन उभे करण्याची चेतावणीही दिली आहे.
संपादकीय भूमिकाअशी मागणी नागरिकांना का करावी लागते ? प्रशासनाला ते लक्षात येत नाही का ? |