भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांची मागणी
पुणे – कोथरूड, कर्वेनगर आणि सिंहगड रस्ता येथील वाहतूककोंडी न्यून करण्यासाठी सिंहगड रस्ता, सन सिटी ते कर्वेनगर असा पूल प्रस्तावित आहे. ‘नदीवरील या पुलाच्या कामाला तातडीने गती द्यावी आणि निविदा प्रक्रिया राबवावी’, अशी सूचना भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना केली. या वेळी आयुक्त, प्रकल्प अधिकारी श्रीनिवास बोनाला यांच्यासह माजी नगरसेवक, नगरसेविका आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. महापालिकेच्या अंदाजपत्रकात या पुलासाठी तरतूद केली आहे; मात्र निविदा प्रक्रिया राबवून प्रत्यक्ष कामाला आरंभ झाला नाही. हा पूल झाल्यास सिंहगड रोड, कोथरूड आणि कर्वेनगर येथील वाहतूकोंडीचा प्रश्न सुटण्यास साहाय्य होईल.