नाशिक येथे अज्ञात विकृतांनी पिसे उपटल्याने घायाळ मोराचा मृत्यू !

कृष्णा मोर

निफाड (नाशिक) – अज्ञात विकृतांनी पिसे उपटल्याने घायाळ झालेल्या कृष्णा नावाच्या मोराचा दुर्दैवी मृत्यू झाला. पिंपळगाव बसवंत येथे हा प्रकार घडला. एका संशयिताला वन विभागाच्या अधिकार्‍यांनी चौकशीसाठी कह्यात घेतले आहे. (स्वार्थासाठी निष्ठूरतेचे टोक गाठणार्‍या संबंधितांना कठोर शिक्षाच व्हायला हवी ! – संपादक)