पतीची हत्या करून त्यास अपघात झाल्याचे भासवणारी पत्नी आणि तिचा प्रियकर यांना पोलीस कोठडी !

उमरखेड (यवतमाळ), ७ ऑगस्ट (वार्ता.) – येथील प्राध्यापक सचिन देशमुख यांची हत्या करून तो अपघात असल्याचे भासवणार्‍या धनश्री देशमुख आणि शिवम बचके (दोघेही वनरक्षक) यांना ७ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पोलिसांच्या अन्वेषणातून या हत्येमागील कारणाचा उलगडा झाला. अमरावती जिल्ह्याच्या सीमेलगत हत्या करून मृतदेह एका नाल्यात फेकून तो अपघात असल्याचे भासवण्यात आले होते.

संपादकीय भूमिका 

नैतिकता संपत चालल्याचे लक्षण !