वृंदावन (उत्तरप्रदेश) येथील आचार्य श्री संजीव कपिल यांचे सनातन संस्थेच्या कार्याला आशीर्वाद

परमहंस आश्रम वृंदावन आणि आश्रम हरि मंदिर, पटौदी यांचे पीठाधीश्वर महामंडलेश्वर श्री स्वामी धर्मदेवजी महाराज यांचे शिष्य आचार्य श्री संजीव कपिल यांची सनातन संस्थेच्या साधकांनी सदिच्छा भेट घेतली.

चेन्नई (तमिळनाडू) येथे ‘हिंदु इळैंगर येळूच्ची पेरवई (हिंदु युवा जागरूकता महासंघ)’ संघटनेने केले धर्मांतरविरोधी निषेध आंदोलन !

कोईंबतूर येथील ‘करुणाइपलम’ या स्वयंसेवी संस्थेने अनुमाने ३०० भिकार्‍यांचे अपहरण करून त्यांना मारहाण केली आणि त्यांचे बळजोरीने धर्मांतर केले. या धर्मांतराच्या विरोधात ‘हिंदु इळैंगर येळूच्ची पेरवई’ या संघटनेने येथील सैदापेट येथे निषेध आंदोलन केले.

बेळगाव येथे नोंदणीकृत वृत्तपत्रे आणि माध्यमे यांच्या पत्रकारांनाच ओळखपत्र देण्यात येणार ! – जिल्हाधिकारी

खोट्या पत्रकारांमुळे अधिकारी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे आता नोंदणीकृत वृत्तपत्रे आणि माध्यमे यांच्या पत्रकारांनाच ओळखपत्र देण्यात येणार आहेत. कोणतेही विनापरवाना वृत्तपत्र, यू ट्यूब, ‘वेबसाईट-बेवपोर्टल’ यांमध्ये काम करणार्‍या पत्रकाराला ओळखपत्र दिले जाणार नाही..

फरिदाबाद (हरियाणा) येथे ‘संतकृपा प्रतिष्ठान’च्या वतीने २ ठिकाणी वृक्षारोपण

सेक्टर २९ मधील हुडा मार्केटजवळच्या पार्कमध्ये झालेल्या कार्यक्रमात ‘रेसिडन्स वेल्फेअर असोसिएशन’च्या सदस्यांनीही सहभाग घेतला. असोसिएशनचे महासचिव श्री. सुबोध नागपाल यांनी ‘संतकृपा प्रतिष्ठान’च्या उपक्रमाचे कौतुक केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना प्रत्येकी २० कोटी रुपयांचा निधी दिला ! – संजय शिरसाट, आमदार

बंडखोरांना स्वबळावर निवडणूक रिंगणात उतरता येण्यासाठी बळ दिले जाईल, अशी माहिती शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी ६ ऑगस्ट या दिवशी एका दैनिकाशी बोलतांना दिली.

बंगलो आणि फार्महाऊस यांसाठी प्लॉट देण्याच्या उद्देशाने ४५० गुंतवणुकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक !

बंगलो आणि फार्म हाऊस यांसाठी प्लॉट देण्याच्या उद्देशाने ४५० गुंतवणुकदारांच्या ‘साईरंग डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड’ या आस्थापनाने कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली.

मानवाधिकार आयोगाकडून महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक आणि मुंबईचे पोलीस आयुक्त यांना नोटीस !

तक्रार करूनही कारवाई न करणार्‍या कर्तव्यचुकार पोलिसांना बडतर्फच करायला हवे !

नक्षलवादाला खतपाणी घालणार्‍यांच्या विरोधातील वैचारिक लढाई जिंकणे आवश्यक ! – अधिवक्त्या रचना नायडू, दुर्ग, छत्तीसगड

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवाद : ‘स्वातंत्र्याची ७५ वर्षे – आतापर्यंत नक्षलवाद का समाप्त झाला नाही ?’

विद्यापिठातील प्रश्नपत्रिका काढतांना चुका करणार्‍या प्राध्यापकांवर कारवाई !

प्रश्नपत्रिकांत चुका करणारे प्राध्यापक मुलांना काय शिकवत असतील ! विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी टाळण्यासाठी अशा प्राध्यापकांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी !

केदार दिघे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज संमत !

दिघे यांच्याविरुद्ध बलात्कार पीडितेला धमकावल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला होता.