नागपूर – येथील नूतन विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी प्रसन्ना-बिदरी यांनी ६ ऑगस्ट या दिवशी प्रभारी विभागीय आयुक्त राधाकृष्णन् बी. यांच्याकडून स्वतःच्या पदाचा कार्यभार स्वीकारला. विजयालक्ष्मी बिदरी-प्रसन्ना यापूर्वी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) येथे नियंत्रक पदावर प्रतिनियुक्तीने कार्यरत होत्या. या वेळी जिल्हाधिकारी आर्. विमलासह इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.