सरकारची फसवणूक करणार्‍या धर्मांधाला मुंबईमध्ये अटक !

मुंबई – ४८ कोटी रुपयांची खोटी देयके देऊन सरकारची फसवणूक करणारे मानखुर्द येथील मे. विवांता मेट्ल कॉर्पाेरेशनचे मालक इम्तियाझ अब्दुल रेहमान सय्यद यांना पोलिसांनी अटक केली आहे. ५ ऑगस्ट या दिवशी महाराष्ट्र राज्य वस्तू आणि सेवा कर विभागाच्या अन्वेषण विभागाकडून ही कारवाई करण्यात आली. मुंबईचे अतिरिक्त महानगर दंडाधिकारी यांनी सय्यद यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे.

महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर (जीएस्टी) वाचवण्यासाठी कोणत्याही वस्तूंची खरेदी-विक्री न करता इम्तियाझ सय्यद यांनी ४८ कोटी रुपयांची खोटी देयके महाराष्ट्र राज्य वस्तू आणि सेवा कर विभागाला दिली होती. देयकांवर सय्यद यांनी ८ कोटी ७० लाख रुपयांची वजावट (इनपूट टॅक्स क्रेडिट) घेतली. सय्यद यांच्यासह अन्य आस्थापनांनी ९ कोटी रुपयांपर्यंत खोटी देयके दिली. देयकांविषयी संशय आल्यामुळे अन्वेषण विभागाने याविषयी चौकशी चालू केली. या प्रकरणी महाराष्ट्र राज्य वस्तू आणि सेवा कर विभागाकडून अधिकचे अन्वेषण चालू आहे.