यवतमाळ, ७ ऑगस्ट (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीकडून यवतमाळ, वणी आणि कारंजा येथे राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी पोलीस प्रशासनास निवेदने देण्यात आली. राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी उच्च न्यायालयाने शासनाला कृती समिती स्थापन करणे, प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाद्वारे होणारा अवमान रोखण्यासाठी विविध माध्यमांतून जनजागृती करणे यांविषयी आदेश दिले आहेत. हिंदु जनजागृती समिती गेल्या १९ वर्षांपासून प्रश्नमंजुषा, व्याख्याने, हस्तपत्रके, भित्तीपत्रके-फ्लेक्स, ध्वनीचित्रफीती, समाजमाध्यमे या माध्यमांतून, तसेच रस्त्यावर पडलेले ध्वज गोळा करणे यांद्वारे जनजागृती करत आहे.
शाळांतून ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ या उपक्रमासमवेत समितीने बनवलेली विशेष ध्वनीचित्रफीत विविध केबलवाहिन्या, चित्रपटगृहे यांत दाखवण्यास अनुमती द्यावी, अशी विनंती समितीकडून निवेदनातून करण्यात आली आहे.