पुणे येथे गणेशोत्सवात ५ दिवस ध्वनीवर्धक वापरण्यास अनुमती !

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ध्वनी प्रदूषणासंबंधीच्या नियमांचे पालन करून गणेशोत्सवामध्ये ४ ऐवजी ५ दिवस सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक आणि ध्वनीवर्धक वापरण्यास अनुमती दिली असल्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिला आहे.

देवेंद्र फडणवीस यांना पुण्यातून लोकसभेची उमेदवारी देण्याची मागणी !

भाजप नक्कीच देवेंद्र फडणवीसांच्या नावाची घोषणा करून त्यांचा सन्मान करतील, अशी आशा अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे.

डोंबिवली येथील अल्पवयीन मुलीला धमकी देणार्‍या धर्मांधाला अटक !

डोंबिवली येथील एका अल्पवयीन मुलीसमवेत इंस्टाग्रामच्या माध्यमातून राजस्थान येथील सोहेल सलामउद्दीन खान (वय १८ वर्षे) याने मैत्री केली आणि तिला विविध प्रकारची आमीषे दाखवली. त्याने तिची अश्लील छायाचित्रे काढून ती सामाजिक माध्यमांतून प्रसारित करण्याची धमकी दिली होती.

‘निर्भय वॉक’ नव्हे, तर ‘पारदर्शक वॉक’ करत अंनिसने डॉ. दाभोलकर यांना (अंध)श्रद्धांजली वहावी !

ज्या अंनिसच्या ट्रस्टचे हात आर्थिक घोटाळ्यांमध्ये बरबटले आहेत, ज्यांनी ट्रस्टच्या निधीत पारदर्शकता ठेवलेली नाही, त्यांनी ‘पुरोगामीत्वा’चा आव आणून ‘विवेका’चा जागर करायचा, ही महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक आहे.

ठार मारण्याची धमकी मिळाल्याने समीर वानखेडे यांची तक्रार !

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेचे मुंबईचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी ‘ट्विटर’ वरून जीवे मारण्याची धमकी आल्याच्या विरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.

विद्वेषाचे मूळ नष्ट करा !

भारताच्या विरोधात एकाने गरळओक केली, तरी कोट्यवधींनी संघटित होऊन तो आवाज दडपला पाहिजे. जेव्हा हे साध्य होईल, तेव्हा कुणीही भारतविरोधी पाऊल उचलतांना १०० वेळा विचार करील. यासाठी नागरिक आणि सरकार दोघांनीही राष्ट्रकर्तव्याचे भान ठेवून कृतीशील व्हावे !

बोरिवली (मुंबई) येथे ४ मजली इमारत कोसळली !

शहरातील बोरिवली येथील ‘गीतांजली’ नावाची ४ मजली इमारत १९ ऑगस्ट या दिवशी दुपारी १२.३० वाजता कोसळली. ही इमारत धोकादायक असल्यामुळे काही दिवसांपूर्वीच रिकामी करण्यात आली होती. त्या

निकृष्ट रस्त्यांचा अहवाल प्राप्त होऊनही कारवाई नाही !

निकृष्ट रस्त्यांचे अहवाल प्राप्त होऊनही कारवाई न होणे, हे प्रशासनाने असंवेदनशीलतेची परिसीमा गाठल्याचे उदाहरण !

‘हाऊसिंग सोसायट्यां’कडून मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रविष्ट !

पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि पुणे जिल्ह्यातील सहस्रो ‘हाऊसिंग सोसायट्यां’मध्ये रहाणार्‍या अनुमाने ६० ते ७० लाख लोकांना प्रतिदिन पुरेसे पिण्याचे अन् घरगुती वापरासाठी पाणी मिळत नसल्याने हाऊसिंग सोसायट्यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रविष्ट केली आहे.

भारतमातेच्या प्रतिमेचे ग्रामपंचायतीच्या कार्यक्रमात पूजन !

‘श्री छत्रपती बहुउद्देशीय संस्थे’च्या वतीने दिलेल्या निवेदनानुसार यश मिळून ग्रामपंचायतीच्या कार्यक्रमात भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ‘असे पूजन सर्व शासकीय कार्यालयांच्या कार्यक्रमात करावे’, अशी मागणी संस्थेचे अध्यक्ष श्री. आकाश दाभाडे यांनी केली आहे.