बोरिवली (मुंबई) येथे ४ मजली इमारत कोसळली !

मुंबई – शहरातील बोरिवली येथील ‘गीतांजली’ नावाची ४ मजली इमारत १९ ऑगस्ट या दिवशी दुपारी १२.३० वाजता कोसळली. ही इमारत धोकादायक असल्यामुळे काही दिवसांपूर्वीच रिकामी करण्यात आली होती. त्यामुळे जीवितहानी टळली; परंतु इमारतीच्या आजूबाजूला असलेल्या नागरिकांपैकी काही जण तेथील ढिगार्‍याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. इमारतीच्या बाजूला असलेल्या पादचारी मार्गावरील काही नागरिक या दुर्घटनेत घायाळ झाले आहेत.