भारतमातेच्या प्रतिमेचे ग्रामपंचायतीच्या कार्यक्रमात पूजन !

अमरावती, १९ ऑगस्ट (वार्ता) – ‘श्री छत्रपती बहुउद्देशीय संस्थे’च्या वतीने ब्राह्मणवाडा थडी येथे दिलेल्या निवेदनानुसार यश मिळून ग्रामपंचायतीच्या कार्यक्रमात भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ‘असे पूजन सर्व शासकीय कार्यालयांच्या कार्यक्रमात करावे’, अशी मागणी संस्थेचे अध्यक्ष श्री. आकाश दाभाडे यांनी केली आहे. ग्रामपंचायतीच्या कार्यक्रमात भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन केले जावे, यासाठी निवेदन दिले होते.