‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’च्या विरोधात सोलापूर येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन’ !

येथील जिल्हा परिषद, पूनम गेट द्वाराजवळ हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने १७ ऑगस्ट या दिवशी सकाळी ११ वाजता ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन’ करण्यात आले.

या शैक्षणिक वर्षात ८०० हून अधिक तंत्रशिक्षण महाविद्यालयांचा शुल्कवाढ न करण्याचा निर्णय !

राज्यातील ८०० हून अधिक विनाअनुदानित तंत्रशिक्षण महाविद्यालयांनी शैक्षणिक वर्ष २०२२ – २०२३ मध्ये शुल्कवाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, वास्तूकला, व्यवस्थापनशास्त्र आदी महाविद्यालयांचा यांत समावेश आहे.

वास्को येथे १७ वर्षीय मुलीचे अपहरण करून बलात्कार

अशा प्रकरणातील खटले वर्षानुवर्षे न चालवता जलद गतीने चालवून बलात्कार्‍यांना फाशी होणे आवश्यक आहे !

घराघरांवर, गाड्यांवर उभारलेले राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक खाली उतरवावेत ! – जिल्हााधिकार्‍यांचे आवाहन

राष्ट्रध्वज उभारण्यासाठी घटनेतील ध्वजसंहितेतील नियम कडक आहेत; मात्र ३ दिवसांसाठी हे नियम शिथिल करण्यात आले होते.

नवे-पारगाव (जिल्हा कोल्हापूर) येथील ‘महात्मा गांधी हॉस्पिटल’ येथे भारतीय स्वातंत्र्यदिनाचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा !

भावी पिढीला ‘स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलीदान केलेले आहे’, हे समजावून सांगावे लागेल ! – रमेश शिंदे, हिंदु जनजागृती समिती

उज्ज्वल भारतासाठी मुलांमध्ये जिज्ञासू वृत्ती जागृत करण्याची आवश्यकता ! – डॉ. रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ

उज्ज्वल भारतनिर्मितीसाठी मुलांमध्ये जिज्ञासू वृत्ती जागृत करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी वाशी येथे केले.

विनायक मेटे यांच्या अपघाताची सीआयडी चौकशी होणार !

शिवसंग्राम पक्षाचे नेते आणि माजी आमदार विनायक मेटे यांच्या अपघाताची सीआयडी चौकशी करण्याचा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस महासंचालकांना दिला आहे. विनायक मेटे यांची पत्नी ज्योती मेटे यांनी अपघातग्रस्त गाडीचे चालक एकनाथ कदम काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे.

राज्यात ठिकठिकाणी सामूहिक राष्ट्रगीत गायन करण्यात आले !

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त १७ ऑगस्ट या दिवशी राज्यात विविध ठिकाणी सामूहिक राष्ट्रगीत गायन करण्यात आले. नागरिकांनी आहे त्या ठिकाणी उभे राहून राष्ट्रगीत म्हटले. शासकीय आणि प्रशासकीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांनीही या अध्यादेशाचे पालन केले.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ‘क्लीन चिट’चा अहवाल मुंबई उच्च न्यायालयाकडून प्रलंबित !

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सिंचन घोटाळ्याच्या प्रकरणातून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून देण्यात आलेल्या ‘क्लीन चिट’चा अहवाल अजूनही उच्च न्यायालयाने स्वीकारलेला नाही. मुंबई उच्च न्यायालयाने अजूनही हा अहवाल प्रलंबित ठेवला असल्याचे समजते.

आंध्रप्रदेश सरकारची सावकारी !

एकूणच आंध्रप्रदेशमधील वाढता हिंदुद्वेष आणि त्याचे वेगाने होणारे ख्रिस्तीकरण, ही हिंदू आणि राष्ट्रप्रेमी यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे. याविरुद्ध समस्त हिंदूंमध्ये जागृती होऊन त्यांनी संघटित झाले पाहिजे अन्यथा पाद्री उपेंद्र राव यांचे देशद्रोही स्वप्न पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही !