विनायक मेटे यांच्या अपघाताची सीआयडी चौकशी होणार !

मुंबई – शिवसंग्राम पक्षाचे नेते आणि माजी आमदार विनायक मेटे यांच्या अपघाताची सीआयडी चौकशी करण्याचा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस महासंचालकांना दिला आहे. विनायक मेटे यांची पत्नी ज्योती मेटे यांनी अपघातग्रस्त गाडीचे चालक एकनाथ कदम काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे. शिवसंग्राम पक्षाचे कार्यकर्ते अण्णासाहेब मायकर यांनीही

‘३ ऑगस्टच्या रात्री ११.३० वाजता शिक्रापूर (जिल्हा पुणे) येथे आयशर टेंपो आणि पांढर्‍या रंगाची चारचाकी पाठलाग करत होते. आयशर टेम्पो विनायक मेटे यांच्या गाडीला पुढे जायला देत नव्हता, तर चारचाकीत ५-६ लोक बसले होते’, असा आरोप केल्याचा व्हिडिओ प्रसारित केला आहे.