राज्यात ठिकठिकाणी सामूहिक राष्ट्रगीत गायन करण्यात आले !

सर्वच स्तरांतून उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त १७ ऑगस्ट या दिवशी राज्यात विविध ठिकाणी सामूहिक राष्ट्रगीत गायन करण्यात आले. नागरिकांनी आहे त्या ठिकाणी उभे राहून राष्ट्रगीत म्हटले. शासकीय आणि प्रशासकीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांनीही या अध्यादेशाचे पालन केले. काही ठिकाणी या अध्यादेशाविषयीची माहिती पोचली नसल्याचेही समजते. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अधिकारी, कर्मचारी, शेतकरी, व्यापारी आणि माथाडी अशा सर्वांनीच राष्ट्रगीताद्वारे भारतमातेला मानवंदना दिली. कोल्हापूर येथील अंबाबाई मंदिर परिसरातही सामूहिक राष्ट्रगीताचे गायन करण्यात आले.