
नवे-पारगाव (जिल्हा कोल्हापूर), १७ ऑगस्ट (वार्ता.) – भारतीय स्वातंत्र्यदिनाचा अमृत महोत्सव ‘महात्मा गांधी हॉस्पिटल’ येथे उत्साहात साजरा करण्यात आला. ‘महात्मा गांधी मेडिकल चॅरिटेबल ट्रस्ट’च्या व्यवस्थापकीय प्रतिनिधी डॉ. (श्रीमती) शिल्पा कोठावळे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.

या प्रसंगी सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये, सनातनच्या पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरे, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे, हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, तसेच गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये, ‘तात्यासाहेब कोरे दंत महाविद्यालया’चे प्राचार्य डॉ. हरिश कुलकर्णी, ‘महात्मा गांधी हॉस्पिटल’चे प्रशासकीय अधिकारी श्री. सुधीर राऊत, श्री. राजन मुखरे यांच्यासह हॉस्पिटलचे कर्मचारी आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

भावी पिढीला ‘स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलीदान केलेले आहे’, हे समजावून सांगावे लागेल ! – रमेश शिंदे, हिंदु जनजागृती समिती
‘‘भारताला सहज स्वातंत्र्य मिळालेले नाही. ते मिळवून देण्यात क्रांतीकारकांचे विशेष योगदान आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, मदनलाल धिंग्रा यांनी विदेशात जाऊन भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी योगदान दिले. याउलट आज काही लोक भारतात सर्व सुविधा असून भारतात शिक्षण घेऊन भारतासाठी काही योगदान न देता विदेशात चाकरी करतात. त्यामुळे आपल्याला भावी पिढीला ‘स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलीदान दिलेले आहे’, हे समजावून सांगावे लागेल.’’

अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन आणि संतांची उपस्थिती हा दुग्धशर्करायोग ! – प्राचार्य डॉ. हरीश कुलकर्णी
‘‘सद्गुरु आणि संत यांची उपस्थिती असल्याने आजचा स्वातंत्र्यदिन आपल्यासाठी विशेष महत्त्वाचा आहे. संतांचे आशीर्वाद आपले महाविद्यालय, रुग्णालय यांना मिळणार आहेत. त्यामुळे अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन आणि संतांची उपस्थिती, हा आज दुग्धशर्करायोग आहे.’’
लाचखोर तहसीलदार विजय चव्हाण यांच्याकडे सापडले घबाड !
‘एन्.आय.टी. गोवा’ची भरती प्रक्रिया तात्पुरती स्थगित !
थोडक्यात महत्त्वाचे : ०९.०६.२०२६
‘हलाल टॅक्स’ हा हिंदूंच्या खिशातून वसूल केला जाणारा ‘जिझिया कर’च ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
पुणे येथे पोलिसांचा गणवेश घालणार्या बनावट मुसलमान महिलेला अटक !
गोव्यातील मटका जुगाराचे अन्वेषण करणारे विशेष अन्वेषण पथक बंद करण्यास याचिकाकर्त्याचा विरोध