गणेशभक्तांची कोणतीही गैरसोय होणार नाही, याची सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी ! – जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी

वर्षातून एकदा येणार्‍या गणेशोत्सवाच्या वेळी गणेशोत्सव मंडळांना ध्वनीप्रदूषणाची माहिती करून देण्यात येते, तशी ३६५ दिवस मशिदींतून पहाटे ५ वाजल्यापासून ५ वेळा होणार्‍या अजानच्या वेळी होणार्‍या ध्वनीप्रदूषणाची माहिती संबंधितांना प्रशासनाने द्यावी, ही अपेक्षा !

…तरच हिंदूंमध्ये अभिमान जागृत होईल !

‘भारत ९०० वर्षे पारतंत्र्यात असल्याने हिंदूंच्या कित्येक पिढ्या गुलामगिरीत जगल्या. आता मनातील गुलामगिरीचे विष नष्ट करण्यासाठी हिंदु राष्ट्राची (ईश्‍वरी राज्याची) स्थापना करण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करणे आवश्यक आहे.

नेतृत्वविकास साध्य करण्यासाठी आध्यात्मिक स्तर आवश्यक ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

नेतृत्वविकास साध्य करण्यासाठी शारीरिक, मानसिक, बौद्धीक किंवा राजकीय स्तरासमवेतच आध्यात्मिक स्तरही असणे आवश्यक असते, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले.

संभाजीनगर येथे ‘हर घर तिरंगा’ मोहिमेसाठी ठेकेदाराकडून सदोष राष्ट्रध्वजांचा पुरवठा !

देशाप्रती राष्ट्रभावना व्यक्त होण्यासाठी ‘हर घर तिरंगा’ ही मोहीम राबवण्यात येत आहे. असे असतांना निकृष्ट दर्जाच्या राष्ट्रध्वजांचा पुरवठा करणे, हे संतापजनक आहे. राष्ट्रध्वजांचा पुरवठा करणार्‍या ठेकेदारांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नोंद करून त्यांना कठोर शिक्षा करायला हवी.

कोल्हापूर येथील पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीजवळ : विद्यापिठाच्या परीक्षा स्थगित !

गेले ४ दिवस होत असलेल्या पावसामुळे पंचगंगा नदीने ४० फूट पातळी ओलांडली असून ती आता धोक्याच्या पातळीकडे म्हणजे ४३ फुटांकडे सरकत आहे. कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर पाणी आल्याने तो मार्ग पोलिसांनी बंद केला आहे.

दीड लाख सदोष राष्ट्रध्वजांचा पुरवठा करणार्‍या कंत्राटदारावर कारवाई करा ! – किशोरी पेडणेकर, माजी महापौर

एवढ्या मोठ्या प्रमाणात सदोष राष्ट्रध्वज सिद्ध करून त्यांचा पुरवठा होईपर्यंत त्याविषयी कुणालाच न कळणे हे गंभीर आहे. अशा पाट्याटाकू कंत्राटदारांवर कठोर कारवाई केल्यासच इतरांना जरब बसेल !