नेतृत्वविकास साध्य करण्यासाठी आध्यात्मिक स्तर आवश्यक ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

श्री. रमेश शिंदे

भाग्यनगर (तेलंगाणा) – कोणत्याही समुहाला दिशा देण्यासाठी नेतृत्वाची आवश्यकता असते. विशेषत: आपत्कालीन परिस्थितीत समाज दिशाहिन होत असतो. अशा परिस्थितीत सामाजिक संघटनांनी नेतृत्व घेऊन कार्य करणे आवश्यक असते आणि हा नेतृत्वविकास साध्य करण्यासाठी शारीरिक, मानसिक, बौद्धीक किंवा राजकीय स्तरासमवेतच आध्यात्मिक स्तरही असणे आवश्यक असते, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ३० जुलै ते १ ऑगस्ट या कालावधीत येथील राजकोटमधील जैन भवनमध्ये ‘नेतृत्वविकास कार्यशाळे’चे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या कार्यशाळेमध्ये नेतृत्वविकास, निर्णयक्षमतेचा विकास, नियोजनक्षमतेचा विकास आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी समितीचे तेलंगाणा आणि आंध्रप्रदेश समन्वयक श्री. चेतन गाडी यांनीही राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भात उपक्रमांविषयी मार्गदर्शन केले.